नवी दिल्ली - कित्येक देशांनी केलेल्या लॉकडाऊन नंतरही कोरोनाचा प्रसार जगभरात होतच आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनाचे ८,५९,०३१ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर, साधारणपणे ४२,३२२ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १,७८,१०१ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.
जगात अमेरिकेत सर्वाधिक (१,८८,५७८) रुग्ण आढळून आले आहेत. तर इटलीमध्ये सर्वाधिक (१२,४२८) लोकांचा बळी गेला आहे. बळींच्या संख्येत इटलीपाठोपाठ स्पेन (८,४६४), अमेरिका (४,०५४), फ्रान्स (३,५२३) आणि चीनचा (३,३०५) क्रमांक लागतो.
गेल्या २४ तासांमध्ये जगभरात सुमारे ७३ हजार नवे रुग्ण, तर साडे चार हजार नवे बळी गेल्याचे आढळून आले आहेत.