मिनियापोलिस - मिनेसोटा राज्याच्या राजधानीत जॉर्ज फ्लॉईड या 42 वर्षांच्या आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याच्या कारवाईदरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर संपूर्ण अमेरिकेसह जगभरात मोर्चे आणि आंदोलने सुरू झाली आहेत. याप्रकरणी मिनियापोलिस प्रशासनाने जॉर्ज फ्लॉईडच्या कुटुंबासोबत 2.7 अमेरिकी डॉलरमध्ये (196 कोटी रुपये ) करार केला आहे. जॉर्जच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी यासंदर्भात घोषणा केली.
जॉर्ज फ्लॉईडच्या भीषण मृत्यू जगभरातील कोट्यावधी लोकांनी पाहिला आणि न्यायाची मागणी केली. हा करार एका श्वेत रंगाच्या व्यक्तींचे जीवन महत्त्वपूर्ण असल्याचा शक्तिशाली संदेश देतो, असे जॉर्ज फ्लॉईडचे वकील बेन क्रम्प म्हणाले.
फेडरल नागरी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल मिनियापोलिस प्रशासनाविरूद्ध गेल्या वर्षी जुलै महिन्यात जार्जच्या कुटुंबाने खटला दाखल केला होता. या खटल्यातून हा तोडगा निघाला आहे. श्वेत लोकांमध्ये भेदभाव करण्याच्या अशा घटना थांबवल्या पाहिजेत, हा या कराराचा संदेश स्पष्ट आहे, असे जार्जचा भाऊ रोडनी यांनी म्हटलं.
जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूला जबाबदार असलेला अधिकारी डेरेक शॉविनविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर खटला सुरू आहे. यावर सुनावणी करण्यासाठी सहा ज्यूरीची निवड करण्यात आली आहे.
काय प्रकरण ?
जॉर्जला अटक करत असताना, एक पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर 8 मिनिटे 48 सेंकद गुडघा ठेवला होता. जॉर्ज त्याला तो गुडघा काढण्यासाठी आर्जव करीत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका," असे जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत, आणि जॉर्जचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत "मला श्वास घेता येत नाही" या घोषवाक्याने आंदोलन सुरू झाले होते. संपूर्ण अमेरिकेसह जगभरात मोर्चे आणि आंदोलने काढण्यात आली होती.
हेही वाचा - ब्रिटनचे राजघराणे वंशवादाचे समर्थन करत नाही - राजपुत्र विल्यम