ETV Bharat / international

'महासत्ते'च्या निवडणुकीचे भवितव्य काय..? - अमेरिका निवडणूक आणि कोरोना महामारी

जगभरात कोरोनासंबंधी प्रश्नांवर विचार सुरु असताना, अमेरिकेची संयुक्त संस्थाने अर्थात अमेरिका या देशात वेगळ्याच महत्त्वपुर्ण प्रश्नाविषयी चिंता आहे. देशातील सर्वच नागरिकांना हा प्रश्न त्रास देत आहे! हा प्रश्न आहे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या आगामी निवडणुकीसंदर्भातील. यंदा सुरळीतपणे निवडणूक पार पडणार की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ती पुढे ढकलण्याची वेळ येणार? कोविडचा प्रसार झालेला असताना सोशल डिस्टन्सिंग राखून मतदारांना आपले मत कसे नोंदवता येईल, यासंदर्भात वेगवेगळ्या मार्गांनी विचार सुरु आहे..

Elections-2020 in the United States of America
'महासत्ते'च्या निवडणुकीचे भवितव्य काय..?
author img

By

Published : Jun 16, 2020, 7:53 PM IST

हैदराबाद : कोविड-19 महामारीमुळे सध्या संपुर्ण जगाला अनेक प्रश्न भेडसावत आहे. ते प्रश्न म्हणजे - शाळा कधी उघडणार? महाविद्यालयीन शिक्षणाचे काय होणार? वर्तमान आणि भविष्यात रोजगाराच्या संधींचे काय फायदे आणि तोटे आहेत? एकीकडे जगभरात या प्रश्नांवर विचार सुरु असताना, अमेरिकेची संयुक्त संस्थाने अर्थात अमेरिका या देशात वेगळ्याच महत्त्वपुर्ण प्रश्नाविषयी चिंता आहे. देशातील सर्वच नागरिकांना हा प्रश्न त्रास देत आहे! हा प्रश्न आहे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या आगामी निवडणुकीसंदर्भातील. यंदा सुरळीतपणे निवडणूक पार पडणार की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ती पुढे ढकलण्याची वेळ येणार. कोविडचा प्रसार झालेला असताना सोशल डिस्टन्सिंग राखून मतदारांना आपले मत कसे नोंदवता येईल, यासंदर्भात वेगवेगळ्या मार्गांनी विचार सुरु आहे. ट्रम्प या गोष्टीला प्राधान्य दाखवत नाहीत याची कारणे काय आहेत..?

राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक..."क्या...कोरोना?"

नेहमीप्रमाणे यंदा नोव्हेंबरमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणार? जर याचे उत्तर हो असेल, तर ती कशा पद्धतीने आयोजित केली जाणार? संपुर्ण जगाला प्रभावित करणारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक यंदा 3 नोव्हेंबर रोजी होणे अपेक्षित आहे. अलीकडे संपुर्ण अमेरिेकेत असंतोष निर्माण करणाऱ्या वर्णद्वेषविरोधी चळवळीच्या पार्श्वभुमीवर, कोरोनामुळे झालेल्या परिणामांसह डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे राष्ट्राध्यक्ष निवडणुकांबाबत शंका आणि उत्सुकता निर्माण होत आहे.

अमेरिकी राज्यघटना काय सांगते?

अमेरिकेत कोणतीही निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते. मात्र, राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पुढे ढकलता येत नाही. त्याचे कारण असे की, अमेरिकी राज्यघटनेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची तारीख स्पष्टपणे निश्चित करण्यात आली आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेत असे नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर, चार वर्षांनंतर येणाऱ्या त्या विशिष्ट वर्षात नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतर ताबडतोब मंगळवारी निर्वाचक मंडळात नव्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षाटी निवडणूक होणे अपेक्षित आहे.

या विशिष्ट तारखेत बदल करावयाचा असल्यास राज्यघटनेत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जरी ट्रम्प यांनी इच्छा दर्शवली, तरी डेमोक्रॅट्सचा(उदारमतवादी) पगडा असणाऱ्या अमेरिकेत प्रतिनिधींच्या सभागृहात असे करण्यास मान्यता मिळेल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. जर ट्रम्प यांच्या विरोधातील दंगलींकडे दुर्लक्ष झाले, तर उदारमतवाद्यांकडेही निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. कारण, कोरोनामुळे आणखी बिकट परिस्थिती निर्माण झाली तर लोक बाहेर पडून मतदान करु शकणार नाहीत. यामुळे, देशात चार महिन्यांनंतर राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार नाही की नाही, ही बाब पुर्णपणे कोविड महामारीचा देशावर काय परिणाम होतो, यावर अवलंबून आहे. जर अशा प्रकारची घटनादुरुस्ती करण्यात आली, तर ही खुप मोठी गोष्ट ठरेल!

जरी हे घडले, तरीही नवा राष्ट्राध्यक्ष येईपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेत राहता येणार नाही..

अमेरिकी राज्यघटनेनुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ केवळ 4 वर्षे आहे. हा कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपुष्टात येईल. नव्याने आलेल्यांच्या निवडीचा त्याच्याशी काही संबंध नाही. जरी ट्रम्प यांनी यावेळी निवडणूक पुढे (जानेवारीनंतर) ढकलली, तरी राज्यघटनेतील तरतुदीनुसार त्यांना 21 जानेवारी 2020 रोजी पदावरुन पायउतार व्हावे लागेल. जर तरीही निवडणूक झाली नाही, तर प्रतिनिधींच्या सभागृहाला (काँग्रेस) नव्या राष्ट्राध्यक्षाची, सिनेट- उपराष्ट्राध्यक्ष तात्पुरती निवड करावी लागेल! काँग्रेसचा कार्यकाळ संपण्यापुर्वी जर निवडणूका आयोजित झाल्या नाहीत, तर राष्ट्राध्यक्षाची निवड करण्याची जबाबदारी सिनेटवर (जसे की भारतात राज्यसभा) येते. मात्र, अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही घडलेले नाही.

जावयाचा शब्द...

अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष बिडेन मागील महिन्यात म्हणाले होते की, "लक्ष ठेवा! ट्रम्प यांनी काहीतरी करुन किंवा सांगून निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला तर, ही आश्चर्याची बाब नसेल." बिडेन हे ट्रम्प यांचे सर्वाधिक बलशाली प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येत आहेत. बिडेन यांच्या वक्तव्यावर ट्रम्प यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. मात्र, व्हाईट हाऊसचे सल्लागार कुशनर यांनी अलीकडे असे वक्तव्य केले आहे की, "मला नक्की माहीत नाही, परंतु देशावर कोरोनाचा झालेला प्रभाव पाहता आगामी निवडणूक पुढे जाण्याची शक्यता दिसत आहे." कुशनर हे ट्रम्प यांचे जावईदेखील आहेत. या वक्तव्यामुळे अमेरिकेतील राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. याशिवाय, आतापासून चार महिन्यांनंतर कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि परिणाम काहीही असो, अमेरिकेतील वर्तमान राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत संपुर्ण जगासह अमेरिकेतील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या गटाकडून आगामी परिस्थिती हाताळण्यासाठी कोणते धोरण राबविले जाणार आहे, याबाबत ही उत्सुकता आहे. अमेरिकी राज्यघटनेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकांविषयी काय सांगण्यात आले आहे आणि निवडणूक पुढे ढकलणे शक्य आहे का, हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. भूतकाळात अशा काही नियमांचे पालन झाले आहे का, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण अमेरिकेचा इतिहास पिंजून काढत आहे.

ट्रम्प यांना डेमोक्रॅट्सना प्रोत्साहन द्यायचे नाही..

जर कोरोनाचा आक्रमक प्रसार झाला, तरीही आगामी निवडणुकांचे व्यवस्थापन करण्याची संधी अमेरिकेत आहे. सर्वसामान्य मतदानाव्यतिरिक्त प्रत्यक्ष मतदान केंद्रावर न जाता मतदान (अॅबसेन्टी बॅलट), टपालाने मतदान (मेल-इन-व्होटिंग) आणि पुर्व-मतदान (प्री-व्होटिंग) यासारख्या पद्धतींचे काही फायदे आहेत. मोठमोठ्या रांगांमध्ये न थांबता टपालाने आपले मत पाठविणे शक्य आहे. अशा अनेक प्रक्रिया अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट आहेत. परंतु केवळ काही विशिष्ट कारणांसाठी आणि विशिष्ट हेतूंसाठी त्यांचा वापर केला जातो. डेमोक्रॅट्सचा असा सल्ला आहे की, कोणालाही मतदान केंद्रावर बोलावण्यापेक्षा प्रत्येकासाठीच टपालाने मतदान लागू करायला हवे. परंतु रिपब्लिकन्स आणि विशेषतः विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ही पद्धत सर्वांसाठी राबवायला तयार नाहीत.

"या पद्धती ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि लष्करी कर्मचाऱ्यांसाठी योग्य आहेत कारण ते घरी येऊ शकत नाहीत. मात्र, प्रत्येकासाठी टपालाने मतदान लागू करणे हे फेरफार करण्यासारखे आहे! अशा पद्धतीने अनेक गैरव्यवहार होऊ शकतात. टपाल मतपत्रिका यंत्रणेत फेरफार होण्याचा धोका आहे. जर प्रत्येकाने अशा फसव्या पद्धतींचा वापर केला, तर रिपब्लिकन पक्ष कधीच अमेरिकेत सत्तेत येऊ शकणार नाही. म्हणून आम्ही याचा विरोध करतो", असे ट्रम्प म्हणाले.

याशिवाय, प्रत्येक राज्यात टपाल मतदान आणि अ‌ॅबसेन्टी व्होटिंगचे नियम सारखेच आहेत. त्यामुळे याचा नेमका काय परिणाम होईल हे सांगणे अशक्य आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेतील कोरोनाची परिस्थिती चार महिन्यांनंतर कशी असेल यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

अ‌ॅबसेन्टी बॅलट..

अ‌ॅबसेन्टी बॅलट हे आपल्याकडील पोस्टल बॅलटप्रमाणे आहे. जर मतदाराला निवडणूकीच्या दिवशी आपले मत देण्यासाठी मतदान केंद्रावर प्रत्यक्षपणे जाणे शक्य नसेल, तर टपालाद्वारे या मतदान पद्धतीचा अवलंब करता येतो.

मेल-इन पोलिंग..

तुम्हाला टपालाने अगोदरच मतपत्रिका पाठवली जाते. ती घेऊन मतदाराला जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपले मत द्यावे लागते. किंवा टपालानेदेखील ही मतपत्रिका पाठवता येते.

अर्ली व्होटिंग..

या पद्धतीमध्ये, मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्याऐवजी आधीच आपले मत देता येते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने राबवली जाते. अशा पद्धतीने मतदान करण्यासाठी, नोंदणीकृत मतदारास या मतदान यंत्रणेस प्राधान्य देण्याची कारणे आणि अशा मतदानासाठी सक्षम आधार सादर करावा लागतो. निवडणूक अधिकाऱ्याच्या परवानगीनंतरच अशा प्रकारचे मतदान शक्य आहे.

इतिहास काय सांगतो?

  • आतापर्यंत कधीही अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली नाही.
  • पहिल्या महायुद्धात तसेच अमेरिकेच्या स्थैर्यापुढे मोठे आव्हान उभे करणाऱ्या 1864 साली झालेल्या सर्वात गंभीर नागरी युद्धादरम्यानदेखील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक थांबली नव्हती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.