मेक्सिको – गर्भपाताच्या अधिकारासाठी मेक्सिको शहरात महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. निषेधाचे प्रतीक दर्शवित काळा ड्रेस घालून 12 हून अधिक महिला थेट पोलिसांशी आंदोलनात भिडल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर महिला संघटनांनी आवाहन केल्यानंतर अनेक महिल्या मेक्सिको एकत्रित आल्या आहेत. काळा ड्रेस घालत, तोंडावर मास्क आणि हातात हिरवा हातरुमाल घेत महिलांनी निदर्शने केली आहेत. यावेळी महिलांनी हातात बॅनर घेत गर्भपाताच्या अधिकाराची मागणी केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात घोषणाबाजी केली आहे.
मेक्सिकोमध्ये गर्भपात करणे हा गंभीर गुन्हा आहे. पहिल्या 12 आठवड्यापर्यंत गर्भपातासाठी इंजेक्शन वापरण्याची परवानगी द्यावी, अशी महिला संघटनांची मागणी आहे. मात्र, तांत्रिक मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने इंजेक्शनचा वापर करून गर्भपाताची परवानगी देण्यास नकार दिला आहे.