ETV Bharat / international

US Elections 2020 : जो बायडेन आघाडीवर, विजयाची शक्यता कमी होताच ट्रम्प यांची न्यायालयात धाव

author img

By

Published : Nov 5, 2020, 1:44 AM IST

Updated : Nov 5, 2020, 2:29 PM IST

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना आत्तापर्यंत २६४ इलेक्टोरल वोट्स मिळाले आहेत. विजयासाठी त्यांना आता फक्त सहा मतांची गरज आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ इलोक्टोरल मते मिळाली आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या विजयाच्या आशा मावळतीला लागल्याचे दिसत आहे...

US Elections 2020 LIVE
अमेरिका निवडणूक

वॉशिंग्टन डी. सी. - अमेरिकेत ४५व्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. त्यानंतर आता मजमोजणी सुरू असून निवडणूकीचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना आत्तापर्यंत २६४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. विजयासाठी त्यांना आता केवळ सहा मतांची गरज आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत २१४ इलोक्टोरल मते मिळाली आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या विजयाच्या आशा मावळतीला लागल्याचे दिसत आहे. पराभव समोर दिसताच ट्रम्प यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक प्रक्रियेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

7:00 AM

ट्रम्प यांनी तीन राज्यांमध्ये खटले दाखल केले..

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅम्पेनने बुधवारी पेन्सिल्व्हेनिया, मिशिगन आणि जॉर्जिया या तीन राज्यांमध्ये खटले दाखल केले आहेत. डेप्युटी कॅम्पेन मॅनेजर जस्टिन क्लार्क यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी त्यांनी पेन्सिल्व्हेनिया आणि नेव्हाडामधील मतदान मोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासंबंधीची याचिकाही दाखल केली आहे. तसेच, पेन्सिल्व्हेनियामध्ये मतदानाच्या दिवसानंतर तीन दिवसांपर्यंत आलेले बॅलोट मतमोजणीसाठी ग्राह्य धरण्यात यावे की नाही याबाबत सुरू असलेल्या खटल्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही ट्रम्प कॅम्पेन करत असल्याचे क्लार्क यांनी सांगितले.

6:45 AM

फिलाडेल्फियामध्ये आंदोलन..

बुधवारी रात्री फिलाडेल्फियाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी गर्दी केली होती. निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रत्येक मताची मोजणी करा, अशी मागणी हे आंदोलक करत होते. 'काऊंट एव्हरी व्होट' असे फलक या आंदोलकांकडे होते.

फिलाडेल्फियामध्ये आंदोलन..

6:30 AM

नेव्हाडा ठरणार किंगमेकर..

सध्या डोनाल्ड ट्रम्प पेन्सिल्व्हेनिया, नॉर्थ कॅरोलिना, अलास्का आणि जॉर्जियामध्ये आघाडीवर आहेत. या चारही राज्यांमध्ये जर ट्रम्प यांचा विजय झाला, तर त्यांना एकूण ५४ इलेक्टोरल व्होट्स मिळतील. त्यानंतर त्यांच्या एकूण इलेक्टोरल व्होट्सची संख्या २६८ होणार आहे. दुसरीकडे, बायडेन यांच्याकडे आताच २६४ इलेक्टोरल व्होट्स आहेत. विजयासाठी त्यांना आणखी केवळ सहा इलेक्टोरल व्होट्सची गरज आहे. नेव्हाडामध्ये सहा इलेक्टोरल व्होट्स आहेत, आणि तिथे बायडेन आघाडीवर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नेव्हाडा किंगमेकर ठरणार आहे.

  • 6:00 AM - नेव्हाडामध्ये बायडेन आघाडीवर; तर ट्रम्प पेन्सिल्व्हेनियामध्ये पुढे..
  • 4:00 AM अनेक राज्यात गुप्तपणे मतदान केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे..
  • मिशिगन राज्यात जो बायडेन यांची विजयी घौडदौड सुरूच, ट्रम्प पिछाडीवर..

बायडेन यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास..

'मला विश्वास आहे आम्हीच विजयी होऊ. हा विजय फक्त माझा किंवा आपला नाही तर संपूर्ण अमेरिकेतील जनतेचा, लोकशाहीचा विजय आहे, असे ट्विट बायडेन यांनी केले आहे.

  • I am confident we will emerge victorious, but this will not be my victory or our victory alone. It will be a victory for the American people, for our democracy, for America.

    — Joe Biden (@JoeBiden) November 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निर्धारित वेळनंतर आलेले मतदान ग्राह्य धरू नका..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे विविध पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अनेक नागरिक पोस्ट, मेल या पर्यायाद्वारे मत नोंदवत आहेत. मात्र, सध्या सुरु असलेले सर्व मतदान थांबवले जायला हवे. निर्धारीत वेळेनंतर आलेले एकही बॅलोट मतमोजणीसाठी ग्राह्य धरले जाऊ नये, अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ असे डोनाल्ड ट्र्म्प म्हणाले होते. माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास, मी जिंकलोच आहे असेही ते म्हणाले आहेत.

कोणाच्या पदरात किती मते?

रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकले आहे. जो बायडेन यांना २५० पेक्षा जास्त इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांना 21४ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या फ्लोरिडा, टेक्सासमध्ये बाजी मारली आहे. तर आणखी पाच ठिकाणावर ते आघाडीवर आहेत.

ट्रम्प पुन्हा इतिहास घडवणार का..?

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये फ्लोरिडाला महत्त्वाचे स्थान आहे. कारण, फ्लोरिडामध्ये एकूण 29 इलेक्टोरल व्होट्स आहेत. जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प दोघांनी फ्लोरिडामधल्या प्रचारावर विशेष भर दिला होता. ज्या उमेदवाराने फ्लोरिडामध्ये विजय मिळवलाय, त्याने पुढे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याचा इतिहास आहे. टेक्सासमध्ये 38, ओहियोत 18, तर नॉर्थ कैरोलिनामध्ये 15, जॉर्जिया 16 आणि आयोवामध्ये 6 इलेक्टोरल व्होट्स आहेत. त्यामुळे येथील विजय निर्णायक ठरतो.

महत्त्वाच्या राज्यात लढाई सुरू..

जिंकण्यासाठी उमेदवाराला २७० इलेक्टोरल वोट मिळणे गरजेचे आहे. मात्र, अद्याप ७० पेक्षा जास्त इलेक्टोरल वोटची मोजणी बाकी आहे. लोकसंख्येनुसार प्रत्येक राज्याला ठराविक मते दिलेली आहेत. काही राज्यांना जास्त महत्त्व असून काही राज्यांचे महत्त्व अत्यल्प आहे.

Last Updated : Nov 5, 2020, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.