ETV Bharat / international

पाकिस्तान हाफिजला शोधत नव्हता, तो दोषी सिद्ध झाल्यावर टाळ्यांचा गजर करू - अमेरिकन समितीने ट्रम्पना फटकारले - trump

हाफिजला डिसेंबर २००१, मे २००२, ऑक्टोबर २००२, ऑगस्ट २००६ (दोन वेळा), डिसेंबर २००८, सप्टेंबर २००९, जानेवारी २०१७ इतक्या वेळा अटक करण्यात आली आणि सोडून देण्यात आले. तो दोषी सिद्ध होईपर्यंत आपण टाळ्यांचा गजर करण्याचे थांबवू,' असे ट्विट समितीने केले आहे.

हाफिज सईद
author img

By

Published : Jul 18, 2019, 12:13 PM IST

वॉशिंग्टन - मुंबईवरील दशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार हफीज सईद याला पाकिस्तानात अटक झाली. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी '१० वर्षांच्या शोधानंतर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या 'कथित सूत्रधारा'ला पाकिस्तानात अटक करण्यात आल्याचा' दावा केला होता. यावरून अमेरिकन परराष्ट्र व्यवहार समितीने ट्रम्प यांना फटकारले आहे. तुमच्या माहितीसाठी; पाकिस्तान हफीजला शोधत नव्हता, तो तेथे बिनधास्तपणे राहात होता,' असे समितीने म्हटले आहे.

'FYI (For Your Information - तुमच्या माहितीसाठी), पाकिस्तान मागील १० वर्षांपासून हाफिजला शोधत नव्हता. हाफिज तेथे बिनधास्तपणे वावरत होता. त्याला डिसेंबर २००१, मे २००२, ऑक्टोबर २००२, ऑगस्ट २००६ (दोन वेळा), डिसेंबर २००८, सप्टेंबर २००९, जानेवारी २०१७ इतक्या वेळा अटक करण्यात आली आणि सोडून देण्यात आले. तो दोषी सिद्ध होईपर्यंत आपण टाळ्यांचा गजर करण्याचे थांबवू,' असे ट्विट समितीने (US House Foreign Affairs Committee) केले आहे.

  • FYI Pakistan wasn't searching for him for 10 years. He’s been living freely, and was arrested and released in:
    December 2001
    May 2002
    October 2002
    August 2006 (twice)
    December 2008
    September 2009
    January 2017

    Let’s hold the 👏 until he’s convicted. https://t.co/qMtD7wgSp9

    — House Foreign Affairs Committee (@HouseForeign) July 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हाफिज सईदला पाकिस्तानात बुधवारी अटक झाली. आता तो दहशतवादविरोधी न्यायालयात (ATC) जामिनासाठी जाणार आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हफीजला पकडण्यात आपल्या दबावाचा वाटा मोठा असल्याचे सांगत या कारवाईचे श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतले आहे. तसेच, 'तब्बल १० वर्षांच्या शोधानंतर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या 'कथित सूत्रधारा'ला पाकिस्तानात अटक करण्यात आली. मागील २ वर्षांतील मोठ्या दबावानंतर त्याचा कसून शोध करण्यावर जोर देण्यात आला होता,' असे ट्विट त्यांनी केले आहे.
लाहोरच्या दहशतवादीविरोधी न्यायालयाने हाफिजसह त्याच्या ३ साथीदारांना ३१ ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केल्यानंतर दोनच दिवसांनी हाफिजविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. हाफिज जमात-उद-दवाह या या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असून त्याला ५० हजार रुपयांवर (पाकिस्तानी रुपया) जामीन देण्यात आला होता. ३ जुलैला या संघटनेच्या १३ नेत्यांवर पाकिस्तानने दोन डझनाहून अधिक आरोप ठेवले होते. यात दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा आणि अवैध आर्थिक व्यवहारांचाही समावेश होता. त्यांच्यावर दहशतवादविरोधी कायदा १९९७ अंतर्गत हे आरोप ठेवले. यात हाफिज आणि नैब एमिर अब्दुल रेहमान मक्की यांचाही समावेश होता.
पाक पंतप्रधान इम्रान खान यांची वॉशिंग्टन येथे ट्रम्प यांच्याशी भेट होणार आहे. त्याच्या काही दिवस आधीच हफीजला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई केली नसती तर, पाकिस्तानवर पॅरिसमधील अँटी-मनी लाँडरिंग वॉचडॉग (Paris-based anti-money laundering watchdog) आणि फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF - Financial Action Task Force) याअंतर्गत काळ्या यादीत टाकण्याची नामुष्की ओढवली असती, अशीही चर्चा आहे.

Intro:Body:

---------------

'FYI' पाकिस्तान हफीजला शोधत नव्हता, तो तेथे बिनधास्तपणे राहात होता - अमेरिकन समितीने ट्रम्पना फटकारले

वॉशिंग्टन - मुंबईवरील दशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार हफीज सईद याला पाकिस्तानात अटक झाली. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी '१० वर्षांच्या शोधानंतर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या 'कथित सूत्रधारा'ला पाकिस्तानात अटक करण्यात आल्याचा' दावा केला होता. यावरून अमेरिकन परराष्ट्र व्यवहार समितीने ट्रम्प यांना फटकारले आहे. 'FYI पाकिस्तान हफीजला शोधत नव्हता, तो तेथे बिनधास्तपणे राहात होता,' असे समितीने म्हटले आहे.

'FYI (For Your Information - तुमच्या माहितीसाठी), पाकिस्तान मागील १० वर्षांपासून हाफिजला शोधत नव्हता. हाफिज तेथे बिनधास्तपणे वावरत होता. त्याला डिसेंबर २००१, मे २००२, ऑक्टोबर २००२, ऑगस्ट २००६ (दोन वेळा), डिसेंबर २००८, सप्टेंबर २००९, जानेवारी २०१७ इतक्या वेळा अटक करण्यात आली आणि सोडून देण्यात आले. तो दोषी सिद्ध होईपर्यंत आपण टाळ्यांचा गजर करण्याचे थांबवू,' असे ट्विट समितीने (US House Foreign Affairs Committee) केले आहे.

हाफिज सईदला पाकिस्तानात बुधवारी अटक झाली. आता तो दहशतवादविरोधी न्यायालयात (ATC) जामिनासाठी जाणार आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्य७ डोनाल्ड ट्रम्प यांनी हफीजला पकडण्यात आपल्या दबावाचा वाटा मोठा असल्याचे सांगत या कारवाईचे श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतले आहे. तसेच, 'तब्बल १० वर्षांच्या शोधानंतर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या 'कथित सूत्रधारा'ला पाकिस्तानात अटक करण्यात आली. मागील २ वर्षांतील मोठ्या दबावानंतर त्याचा कसून शोध करण्यावर जोर देण्यात आला होता,' असे ट्विट त्यांनी केले आहे.

लाहोरच्या दहशतवादीविरोधी न्यायालयाने हाफिजसह त्याच्या ३ साथीदारांना ३१ ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केल्यानंतर दोनच दिवसांनी हाफिजविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. हाफिज जमात-उद-दवाह या या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असून त्याला ५० हजार रुपयांवर (पाकिस्तानी रुपया) जामीन देण्यात आला होता. ३ जुलैला या संघटनेच्या १३ नेत्यांवर पाकिस्तानने दोन डझनाहून अधिक आरोप ठेवले होते. यात दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा आणि अवैध आर्थिक व्यवहारांचाही समावेश होता. त्यांच्यावर दहशतवादविरोधी कायदा १९९७ अंतर्गत हे आरोप ठेवले. यात हाफिज आणि नैब एमिर अब्दुल रेहमान मक्की यांचाही समावेश होता.

पाक पंतप्रधान इम्रान खान यांची वॉशिंग्टन येथे ट्रम्प यांच्याशी भेट होणार आहे. त्याच्या काही दिवस आधीच हफीजला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई केली नसती तर, पाकिस्तानवर पॅरिसमधील अँटी-मनी लाँडरिंग वॉचडॉग (Paris-based anti-money laundering watchdog) आणि फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF - Financial Action Task Force) याअंतर्गत काळ्या यादीत टाकण्याची नामुष्की ओढवली असती, अशीही चर्चा आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.