ETV Bharat / international

JusticeforGeorgeFloyd : जॉर्ज फ्लॉइडला अखेर मिळाला न्याय, दोषीला 22 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा - कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी अपडेट

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड हत्या मृत्यू प्रकरणात मिनिआपोलिसचे माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांना 22 वर्ष आणि 6 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अखेर एका वर्षानंतर जॉर्ज फ्लॉइड यांना न्याय मिळाला असून 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर' चळवळीला यश आले आहे.

जॉर्ज फ्लॉइड
जॉर्ज फ्लॉइड
author img

By

Published : Jun 26, 2021, 10:42 AM IST

Updated : Jun 26, 2021, 2:46 PM IST

मिनिआपोलिस - कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या हत्या प्रकरणात अमेरिकेच्या एका कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या मिनिआपोलिसचे माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांना 22 वर्ष आणि 6 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी वॉशिंग्टनच्या हेन्नेपिन काउंटी कोर्टाने मिनियापोलिसचे माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांना कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवले होते. अखेर एका वर्षानंतर जॉर्ज फ्लॉइड यांना न्याय मिळाला असून 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर' चळवळीला यश आले आहे.

Derek Chauvin gets 22.5 years in prison for George Floyd's death
वळपास ५०० लोकांनी एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

फिर्यादींनी 30 वर्षांची शिक्षा डेरेक शॉविनयांना ठोठवण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र, डेरेक शॉविन यांच्यावर पूर्व गुन्हेगारीची नोंद नाही. त्यामुळे न्यायाधीशांना 10 वर्ष ते 15 वर्षे दरम्यान शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. न्यायाधीश पीटर ए. कॅहिल यांनी शॉविनला 22 वर्षे 6 महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर' चळवळीला यश

दोषी आढळलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आई कॅरोलिन पावलेन्टी न्यायालयात उपस्थित होत्या. आपल्या मुलावर दया दाखवावी, अशी विनंती त्यांनी न्यायधीशांना केली. तुम्ही सत्यापासून दूर आहात. माझ्या मुलावरील सर्व आरोप खोटे आहेत. माझा मुलगा एक चांगला माणूस आहे, असे त्यांनी न्यायालयात म्हटलं. तसेच डेरेकला उद्देशून त्या म्हणाल्या, की मी नेहमीच तुझ्या निरागसतेवर विश्वास ठेवला आहे. तुझ्या परतण्याची मी वाट पाहील. यावेळी त्या भावनिक झाल्या होत्या.

कसा झाला होता जॉर्ज फ्लॉइड यांचा मृत्यू?

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडला अटक करत असताना, पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर 8 मिनिटे 48 सेंकद गुडघा ठेवला होता. जॉर्ज पोलिसाला तो गुडघा काढण्यासाठी आर्जव करत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका," असे जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत, आणि जॉर्जचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जगभरात वातावरण तापले होते.

भावपूर्ण वातावरणात जॉर्ज फ्लॉइड यांना अखेरचा निरोप!

कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांकडून बळी गेल्यानंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये आगडोंब उसळला आहे. अमेरिकेसह जगभरात मोर्चे आणि आंदोलने सुरू झाली आहेत. विविध ठिकाणी 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर' नावाने निदर्शने करण्यात आली. शांततेत केलेल्या या निदर्शनांमधून हजारो नागरिकांनी जॉर्ज फ्लॉइडला श्रद्धांजली वाहिली होती. #BlackLivesMatter आणि #JusticeforGeorgeFloyd हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड झाले होते.

जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर कृष्णवर्णीयांचा उद्रेक

जॉर्ज फ्लॉइड यांना अखेरचा निरोप -

जॉर्ज फ्लॉइडच्या कुटुंबीयांनी भावपूर्ण वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि श्रद्धांजली वाहिली. कुंटुंबीयांसोबत नातेवाईक आणि मित्र परिवाराने ह्युस्टनमधील प्रेज चर्च येथे मंचावर एकत्र येऊन त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी जवळपास 500 लोकांनी एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक मास्क घालून तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत दफनभूमीत उपस्थित होते.

निदर्शनांमधून हजारो नागरिकांनी जॉर्ज फ्लॉइडला श्रद्धांजली वाहिली

हत्येचे ते दृश्य कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या मुलीला पुलित्झर पुरस्कार-

जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा तो हृदय हेलावून टाकणारा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या डार्नेला फ्रेझियरलाही या मुलीला यंदाचा पुलित्झर पुरस्कार देण्याता आला आहे. डार्नेला फ्रेझियर या मुलीने जॉर्ज फ्लॉएडची हत्येची घटना कॅमेऱ्यात कैद केली होती. त्यानंतरच पोलिसांचे निर्दयी कृत्य समोर आले होते. हा व्हिडिओ जोरदार व्हायर झाला होता. त्यानंतरच अमेरिकेत वर्णद्वेषाविरोधात मोठे आंदोलन उभे राहिले होते. तसेच मिनीआपोलिस पोलिसांकडून करण्यात येत असलेली जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यू चौकशीचे आणि आंदोलनाचे कव्हरेज केल्याबद्दल 'ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग' प्रकारात द स्टार ट्रिब्यूनच्या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

अखेर एका वर्षानंतर जॉर्ज फ्लॉइड यांना न्याय मिळाला.

हेही वाचा - 'तो जग बदलणार आहे'...भावपूर्ण वातावरणात जॉर्ज फ्लॉइड यांना अखेरचा निरोप!

हेही वाचा - कृष्णवर्णीय नागरिकांच्या समर्थनार्थ ऑस्ट्रेलियात 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर' नावाने निदर्शने

Last Updated : Jun 26, 2021, 2:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.