ETV Bharat / international

रिपब्लिकन राष्ट्रीय परिषद आणि ट्रम्प यांच्या भाषणाचा अर्थ उलगडताना...

author img

By

Published : Aug 31, 2020, 8:22 PM IST

ही निवडणूक आम्ही जीवन जगण्याच्या अमेरिकन मार्गाचा बचाव करू शकतो का की, मूलगामी चळवळीला तिला सपूर्णपणे उध्वस्त करून नष्ट करण्यास परवानगी देतो, याचाही निर्णय करणार आहे. डेमोक्रेटिक राष्ट्रीय परिषदेत, ज्यो बिडेन आणि त्यांच्या पक्षाने अमेरिकेला वारंवार वंशवादी, आर्थिक आणि सामाजिक अन्यायाची भूमी असा हल्ला चढवला होता. त्यामुळे आज रात्री मी एक अगदी साधा प्रश्न विचारतो. डेमोक्रेट पक्षाला जो आमच्या देशाच्या चिंध्या करण्यासाठी इतका वेळ घालवतो आहे, देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते का? असे ट्रम्प यांनी आपल्या ७१ मिनिटांच्या दिर्घ भाषणात विचारले आहे.

ट्रम्प
ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ताधारी पक्षाकडून अध्यक्षीय उमेदवारी अधिकृतपणे स्विकारली आणि रिपब्लिकन राष्ट्रीय परिषदेवर पडदा पडला. कन्या इव्हांका ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर आपल्या वडलांची ओळख करून दिली आणि यावेळी सारे प्रतिनिधी शारिरिक अंतराचा फज्जा उडवत बसले होते. कित्येकांनी मास्कही तोंडावर बांधले नव्हते, जेव्हा की कोविड महामारीने अमेरिकेत एक लाख ८० हजार लोकांचा बळी घेतला आहे आणि अजूनही वाढत आहेत. इव्हांका यांनी आपल्या भाषणात आपल्या वडलांना लोकांचा अध्यक्ष म्हणून सादर केले आणि ते राजकीय दृष्ट्या चूक असतील, पण अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी कठोर परिश्रम करत असल्याचे सांगितले.

'माझ्या वडिलांच्या धारणा प्रखर आहेत. ज्या गोष्टीवर त्यांचा विश्वास आहे, ती गोष्ट त्यांना माहिती आहे आणि जे ते विचार करतात, तेच बोलतात. तुम्हाला त्यांचे म्हणणे पटो किंवा न पटो, त्यांची भूमिका काय आहे, हे तुम्हाला नेहमीच माहिती असते. माझ्या वडलांची संवादाची शैली ही प्रत्येकाला आवडत नाही, हे मला मान्य आहे. मला हेही माहीती आहे की, त्यांचे ट्विट्स जसे आहेत तसेच प्रसिद्ध झाल्यासारखे वाटतात. परंतु परिणाम जे सांगायचे ते सांगतात,' असे इव्हांका ट्रम्प म्हणाल्या.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणाचा भर आपले विरोधी उमेदवार ज्यो बिडेन यांना लक्ष्य करण्यासाठी आणि आपल्या ४७ वर्षांची जुन्या वैधानिक कामगिरीची उजळणी करण्यावर ठेवला होता. डेमोक्रेट्सना त्यांनी अति मूलगामी डावे या शब्दांत रंगवले आणि वंशभेद आणि ब्लॅक लाईव्हजच्या मुद्यांवर मिनेपोलिस आणि केनोशा या डेमोक्रेटिक्सचे नियंत्रण असलेल्या शहरांमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ का झाली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही निवडणूक आमच्या देशाच्या इतिहासात सर्वाधिक महत्वपूर्ण निवडणूक आहे. आतापर्यंत कधीही मतदारांसमोर इतका स्पष्ट निवडीचे पर्याय समोर आले नव्हते, दोन पक्ष, दोन दृष्टिकोन, दोन तत्वज्ञान किंवा दोन अजेंडा यापैकी एकाची निवड त्यांनी करायची आहे. ही निवडणूक आम्ही अमेरिकन स्वप्न वाचवू शकतो की इतरांची काळजी घेणार्या आमच्या नियतीला समाजवादी अजेंड्याकडून उध्वस्त करण्याची परवानगी देतो, हे ठरवणार आहे, असे ट्रम्प म्हणाले. ही निवडणूक आम्ही जीवन जगण्याच्या अमेरिकन मार्गाचा बचाव करू शकतो का की, मूलगामी चळवळीला तिला सपूर्णपणे उध्वस्त करून नष्ट करण्यास परवानगी देतो, याचाही निर्णय करणार आहे. डेमोक्रेटिक राष्ट्रीय परिषदेत, ज्यो बिडेन आणि त्यांच्या पक्षाने अमेरिकेला वारंवार वंशवादी, आर्थिक आणि सामाजिक अन्यायाची भूमी असा हल्ला चढवला होता. त्यामुळे आज रात्री मी एक अगदी साधा प्रश्न विचारतो. डेमोक्रेट पक्षाला जो आमच्या देशाच्या चिंध्या करण्यासाठी इतका वेळ घालवतो आहे, देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते का? असे ट्रम्प यांनी आपल्या ७१ मिनिटांच्या दिर्घ भाषणात पुढे विचारले.

रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्यक्ष राष्ट्रीय परिषदेने गेल्या आठवड्यात झालेल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या व्हर्च्युअल परिषदेवर कशी मात केली? पक्षाच्या अधिवेशनासाठी, अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ऐतिहासिक व्हाईटहाऊसचा सहारा घेतल्याबद्दल अनेकांनी टिका केली आहे. ट्रम्प यांना अधिक मानवतावादी करून अधिक काळजी घेणारा सहानुभूतीपूर्ण नेता अशी त्यांची प्रतिमा समोर आणण्यासाठी, ज्यांनी भाषण केले त्या वक्त्यांची निवड करण्यात आली का? नोव्हेंबरमध्ये होणार्या अध्यक्षीय निवडणुकीत मुख्य मुद्दे कोणते असतील? वरिष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांनी बॅटलग्राऊंड यूएसए २०२० या विशेष मालिकेत आरएनसी आणि ट्रम्प यांच्या अधिकृत उमेदवारीचा स्विकार करतानाच्या भाषणातील प्रमुख मुद्यांवर चर्चा केली आहे.

वॉशिंग्टन डीसीहून बोलताना, वरिष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखिका सीमा सिरोही म्हणाल्या की, 'व्हाईटहाऊसच्या हिरवळीवर १५०० लोक उपस्थित होते आणि त्यापैकी फार थोड्यांनी मास्क बांधले होते. ही गोष्ट अत्यंत दखलपात्र होती. खुर्च्या एकमेकांच्या अगदी जवळ होत्या. जणू महामारीचे अस्तित्वच नाही. एका वक्त्याने महामारीबद्दल बोलताना भूतकाळाचा वापर केला. त्यामुळे ते अगदी वेगळेच वास्तव होते, एखादे पर्यायी जग असावे, असे वाटत होते. व्हाईटहाऊसच्या एका प्रवेशद्वारावर आंदोलक होते आणि फाटकावर पोलीस होते. उद्या वॉशिंग्टनमध्ये मोठा मोर्चा निघणार आहे. मला असे वाटते की दोन वेगळेच देश येथे आहेत. असे काही काळापासून जाणवत आहे परंतु इतक्या स्पष्ट शब्दांत आज ते मांडले गेले आहे.'

तुम्ही अमेरिका काय आहे आणि ट्रम्प यांच्या दृष्टिकोनातून ती कशी असली पाहिजे, ही कथा तुम्ही ऐकली आणि आम्ही अमेरिका काय आहे आणि कशी असावी, हे बिडेन यांच्या मोहिमेतून काही दिवसांपूर्वी ऐकले. एका स्तरावर दोन्ही दृष्टिकोन हे समान वैध किंवा अवैध आहेत. कुणाला प्रत्यक्षात त्याच्या दृष्टिकोनासाठी बहुमताचा पाठिंबा मिळतो, यावरून निवडणूक ठरेल, असा युक्तिवाद द हिंदूचे सहयोगी संपादक व्हर्गीस के जॉर्ज यांनी केला. 'ओपन एम्ब्रासः इंडो यूएस टाईज इन द एज ऑफ मोदी अँड ट्रम्प' हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.

ट्रम्प आणि बिडेन यांनी सादर केलेल्या दोन दृष्टिकोनातील स्पर्धेत, ट्रम्प यांचा दृष्टिकोन जो आज सादर केला गेला, त्यात आम्ही विषाणुची पर्वा करत नाही, आम्ही अशी संस्कृती आहोत की जी विषाणुपुढे शरणागती पत्करत नाही तर फिरून संघर्ष करते आणि आम्ही विजयी होऊ तसेच विषाणुला चिरडून टाकू, असे अमेरिकन लोकांना तसेच जगासमोर अमेरिकन इतिहासाचे सादर केलेले विवेचन होते. अमेरिकन लढण्यासाठी इराकला गेले आणि मध्यपूर्वेत त्यांनी लोकशाही स्थापित केली, असे प्रत्यक्षात मानणारा हा देश आहे, असे व्हर्गिस जॉर्ज यांनी पुढे सांगितले. २०१६च्या अमेरिकन निवडणुकीत त्यांची वॉशिंग्टन डीसीमध्ये नियुक्ती वृत्तांकनासाठी करण्यात आली होती. रिपब्लिकन्स आणि भाजपच्या राजकीय वैचारिक मोहिमांमध्ये समानता सांगताना, त्यांनी विशाल हिंदू-हिंदुत्व अजेंड्याला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जातीचे अडथळे ओलांडले, त्याचप्रमाणे ट्रम्प ब्लॅक लाईव्हज मॅटर मुद्यावर आपल्या सनातनी ख्रिश्चन धर्मावर आधारलेल्या विवेचनाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने असलेल्या कॅथॉलिक पंथियाना आवाहन करत आहे. ही मांडणी अशी आहे की तिच्याद्वारे नियोजनबद्ध वंशवादाविरोधातील निदर्षनांमध्येही आफ्रो अमेरिकन समुदायालाही एकत्र ठेवतो.

आपल्या उमेदवारी स्विकारण्याच्या भाषणात, ट्रम्प यांनी बिडेन यांच्यावर बिजिंगप्रति सौम्य भूमिका घेतल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, बिडेन जर निवडून आले तर चिन आमच्या देशाचा मालक होईल. जेरूसलेमला अमेरिकन दूतावास हलवण्याच्या आणि अमेरिकन प्रणित संयुक्त अरब अमिरात आणि इस्त्रायल यांच्यातील करारावर त्यांनी प्रकाशझोत टाकला.

मी जेव्हा पदावर आलो, तेव्हा मध्यपूर्वेत साराच गोंधळ होता. आयएसआयएस बेफाम सुटली होती, इराण वरचढ होत होता आणि अफगाणिस्तानातील युद्धाचा शेवट तर दृष्टिपथातही नव्हता. मी एकतर्फी इराण अण्वस्त्र करारातून माघार घेतली. माझ्या अगोदरच्या अनेक अमेरिकन अध्यक्षांच्या विपरित, मी दिलेली वचने पाळली, इस्त्रायलचे खरे भांडवल ओळखले आणि आमचा दूतावास जेरूसलेमला हलवला. परंतु ते भविष्यातील स्थळ आहे, याबद्दल आम्ही फक्त बोललो नाहीत तर त्याची उभारणी केली, असे ट्रम्प म्हणाले. गोलन टेकड्यांच्या मुद्यावर आम्ही इस्त्रायली सार्वभौमत्वाला मान्यता दिली आणि या महिन्यात आम्ही २५ वर्षातील पहिला मध्यपूर्व करार केला. याशिवाय, आम्ही इसिसच्या खलिफांचा १०० टक्के अधिकार नष्ट केला आणि त्यांचा संस्थापक तसेच नेता अबु बकर अल बगदादीला ठार केले. नंतर, एका स्वतंत्र कारवाईत, आम्ही जगातील क्रमांक एकचा दहशतवादी कासिम सोलेमानीला ठार मारले. पूर्वीच्या प्रशासनांच्या विरोधात जाऊन, मी अमेरिकेला नवीन युद्धांपासून बाहेर काढले आणि आमचे सैन्य माघारी स्वदेशी येत आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

स्मिता शर्मा यांनी मायथोस लॅब्जचे जी हिंसक दहशतवादाच्या मुकाबल्यावर लक्ष केंद्रीत करते, सीईओ प्रियंक माथूर यांना, ट्रम्प यांची मध्यपूर्वेसाठीची शांतता योजना आणि बगदादी आणि सोलेमानीला ठार मारणे निवडणुकीचा मुद्दा म्हणून गाजेल का, असे विचारले. तेव्हा ते म्हणाले की, सहसा अमेरिकन निवडणुकीत परराष्ट्रातील घटक निवडणुकीचे मुद्दे होत नाहीत. परंतु दोन् स्थिती असू शकतात. हे विशेष प्रकरण आहे, कारण इस्त्रायलला परराष्ट्र धोरणात विशेष उपवर्गवारी दिली आहे. उजव्या गटात विश्वास हा मोठा भाग आहे. माथूर यांनी युक्तिवाद केला की, शांतता कराराचे गुण किंवा अवगुण काहीही असले तरीही हा धार्मिक आधाराचे तो संकेत देत आहे. कासिम सोलेमानी किंवा बगदादी ही ओसामा बिन लादेनइतकी मोठी नावे नाहीत. ते असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की हे आमचे बिन लादेन आहेत आणि आम्ही त्याना ठार मारले. यातील तथ्य हे आहे की, बहुतेक अमेरिकनांना कासिम सोलेमानी कोण होता, हेच माहित नाही, असे प्रियंक माथूर यांनी सांगितले. त्यांनी अमेरिकन नौदलाने ओबामा राजवटीत ओसामा बिन लादेनला ठार मारल्यानंतर अमेरिकन रस्त्यांवर जो काही जल्लोष केला, त्याचे स्मरण करून दिले.

या चर्चत अमेरिकेतील टपालाद्वारे मतपत्रिकांचा मुद्यावरही भर देण्यात आला कारण कोरोना विषाणुमुळे नागरिकांना वाटणाऱ्या चिंता खऱ्याखुऱ्या आहेत. पॅनलवरील तज्ञांनी निवडणुका संपल्यावर ४ नोव्हेंबरला निकाल जाहिर केले जाणार नाहीत कारण एका आठवड्याने निकाल उशिरा लागू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.