मेक्सिको - जगात अनेक ठिकाणी काही अनोखे किंवा विचित्र असे फेस्टीव्हलही साजरे केले जातात. मेक्सिकोमध्ये दरवर्षी लोक 'डे ऑफ द डेड' नावाचा उत्सव साजरा करतात. यावेळी लोक भुते आणि सांगाड्यांसारखे दिसणारे कपडे घालून घराबाहेर पडतात. दोन दिवस असणार हा विचित्र उत्सव आजपासून सुरू झाला आहे.

मेक्सिकोतील लोकांचा असा विश्वास आहे की, या दिवशी त्यांच्या पूर्वजांचे आत्मे कुटुंबासमवेत एक दिवस जगतात. म्हणून ते हा सण साजरे करतात.

या उत्सवाच्या निमित्ताने शहरामध्ये एक फेरी होते. ज्यामध्ये लोक भुतासारखे कपडे घालतात. या फेरीमध्ये सहभागी होऊन स्थानिकांनबरोबर पर्यटकही याचा आनंद घेतात.