ETV Bharat / international

अमेरिकेत एप्रिलमध्ये कोविड - 19 लस उपलब्ध होणार - America Corona Latest News

सीबीएस न्यूजला अजार यांनी दिलेल्या मुलाखतीचा हवाले देताना सिन्हुआ वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. 'जानेवारी अखेरीस आमच्या वरिष्ठ, आरोग्यसेवा कामगार आणि प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात लसी तयार होतील. मार्च आणि एप्रिलच्या अखेरीस सर्व अमेरिकन लोकांना पुरेशी लस उपलब्ध होईल,' असे अजार यांनी म्हटले.

अमेरिका कोरोना लेटेस्ट न्यूज
अमेरिका कोरोना लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Oct 23, 2020, 10:27 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेचे आरोग्य आणि मानवी सेवा मंत्री अ‍ॅलेक्स अझर (एचएचएस) यांनी कोविड - 19 ची लस पुढील वर्षाच्या (2021) एप्रिलपर्यंत सर्व अमेरिकन नागरिकांना उपलब्ध करुन दिली जाऊ शकते, असे म्हटले आहे.

सीबीएस न्यूजला अझर यांनी दिलेल्या मुलाखतीचा हवाला देताना सिन्हुआ वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. 'जानेवारी अखेरीस आमच्या वरिष्ठ, आरोग्यसेवा कामगार आणि प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात लसी तयार होतील. मार्च आणि एप्रिलच्या अखेरीस सर्व अमेरिकन लोकांना पुरेशी लस उपलब्ध होईल,' असे अझर यांनी म्हटले.

हेही वाचा - अमेरिकेची कोविड -19वरील उपचारांसाठी अ‌ँटिव्हायरल रेमडेसिव्हिर औषधास पूर्ण मंजूरी

अझर म्हणाले की, एचएचएसजवळ वर्षाच्या अखेरीस 'असुरक्षित प्रवर्गातील लोकांना' लस देण्यासाठी यूएस फूड अ‌ॅण्ड ड्रग अ‌ॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) कडून पुरेशा प्रमाणात लस देण्यात येईल.

सध्या, कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत येथे एकूण कोविडचे 84 लाख 4 हजार 743 रुग्ण आढळले आहेत. तर, 2 लाख 23 हजार रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

हेही वाचा - मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून 'भीती'च्या अस्त्राचा वापर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.