ETV Bharat / international

चिंताजनक.. कोरोना महामारी दोन वर्ष राहणार, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

author img

By

Published : Aug 22, 2020, 2:53 PM IST

जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस म्हणाले, की 1918 मध्ये आलेला स्पॅनिश फ्ल्यू संपण्यासाठी दोन वर्षे लागली होती. मात्र, सध्याच्या तंत्रज्ञानाने महामारीवर मात करण्यासाठी त्या मानाने कमी वेळ लागू शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक
जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक

जिनिव्हा - कोरोनाच्या लसीचे उत्पादन लवकरच होण्याची शक्यता असताना जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त होणार मत व्यक्त केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी जगभरात सुरू असलेली महामारी दोन वर्षात संपेल, असे सांगितले. ते ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यां नी महामारीत राष्ट्रीय एकता व जागतिक दृढ ऐक्य ठेवण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित केले.

जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस म्हणाले, की 1918 मध्ये आलेला स्पॅनिश फ्ल्यू संपण्यासाठी दोन वर्षे लागली होती. मात्र, सध्याच्या तंत्रज्ञानाने महामारीवर मात करण्यासाठी त्या मानाने कमी वेळ लागू शकतो. जास्त संपर्कामुळे विषाणू पसरण्याची शक्यता अधिक असते. त्याचवेळी आपल्याकडे संसर्ग थांबविण्यासाठी तंत्रज्ञान आणि ज्ञान आहे.

पीपीईमध्ये भ्रष्टाचार करणे म्हणजे मला वाटते खून आहे. कारण आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई मिळाले नाही तर त्यांच्यी जीवाला धोका होणार आहे. तसेच ज्यांच्यावर उपचार होत आहेत, त्यांच्याही जीवनाला धोका होणार आहे.

कोरोना महामारीमुळे हवामान बदलावर काम करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे. इतिहासातही महामारी आणि संसर्गजन्य रोगांमुळे आर्थिक आणि सामाजिक परिणाम झाले आहेत. यावेळीही तसेच घडणार असल्याचे त्यांनी सूचित केले. आकाश आणि नदी स्वच्छ होवू शकतात, हे जागतिक आरोग्य संकटाने दाखवून दिले आहे. आपण आणखी मागे जावून बांधणी करणे म्हणजे पुन्हा हरित बांधणी करणे आहे. कोरोना ही शतकामध्ये होणारी महामारी आहे. मात्र, जगाला बदलणारी शतकामध्ये मिळणारी संधी आहे. त्यामधून मुलांना पुढील पिढ्यांसाठी हवे तसे घडविता येणे शक्य आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.