ETV Bharat / international

अमेरिकेत कोरोनाचे बळी 2.6 लाखांवर, मार्च 2021 पर्यंत 4.7 लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज

कोविड - 19च्या अमेरिकेतील रुग्णांची संख्या 1.26 कोटी आणि मृत्यूंची संख्या 2 लाख 60 हजार 322 पर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेतील सर्वाधिक मृत्यू न्यूयॉर्क राज्यात झाले आहेत. येथे आतापर्यंत 34 हजार 362 जणांचा बळी गेला आहे. त्यापाठोपाठ टेक्सास दुसर्‍या क्रमांकावर असून येथे 21 हजार 245 लोकांचा मृत्यू झाला आहे. 1 मार्च 2021 पर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 4 लाख 70 हजार 974 पर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अमेरिका कोरोना मृत्यू न्यूज
अमेरिका कोरोना मृत्यू न्यूज
author img

By

Published : Nov 26, 2020, 4:30 PM IST

न्यूयॉर्क - अमेरिकेत कोविड - 19 मधील मृतांची संख्या बुधवारी वाढून 2.6 लाखांवर गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सीएसएसईच्या आकडेवारीनुसार, कोविड - 19च्या देशातील रुग्णांची संख्या 1.26 कोटी आणि मृत्यूंची संख्या 2 लाख 60 हजार 322 पर्यंत पोहोचली आहे.

अमेरिकेतील सर्वाधिक मृत्यू न्यूयॉर्क राज्यात झाले आहेत. येथे आतापर्यंत 34 हजार 362 जणांचा बळी गेला आहे. त्यापाठोपाठ टेक्सास दुसर्‍या क्रमांकावर असून येथे 21 हजार 245 लोकांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्निया, फ्लोरिडा आणि न्यू जर्सी या राज्यात 16 हजारांहून अधिक मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा - चीनमध्ये कोरोनाचे १२ नवे रुग्ण सापडले, सर्व विदेशातून आलेले

वृत्तसंस्था सिन्हुआच्या म्हणण्यानुसार, 9 हजाराहून अधिक मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये इलिनॉईस, मॅसाच्युसेट्स, पेनसिल्वानिया, जॉर्जिया आणि मिशिगन यांचा समावेश आहे.

कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू जगात अमेरिकेत सर्वाधिक आहेत. संपूर्ण जगात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी तब्बल 18 टक्के मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. येथे मंगळवारी 2 हजार 146 लोक मृत्यूमुखी पडले. सीएसएसईच्या चार्टनुसार मेनंतरची ही सर्वात मोठी संख्या आहे.

वॉशिंग्टनच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अ‌ॅण्ड इव्हॅल्युएशन विद्यापीठाच्या मॉडेलच्या अंदाजानुसार 1 मार्च 2021 पर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 4 लाख 70 हजार 974 पर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - इराणमध्ये कोरोनाचे 12 हजार 460 नवीन रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.