सॅनफ्रान्सिस्को –विजेच्या गडगडाटासह ढगफुटी होणार असल्याच्या इशाराऱ्यानंतर कॅलिफॉर्नियाच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. जे क्षेत्र खाली करण्यास सांगितले आहे, अशा ठिकाणी राहू नये, अशी अग्निशमन दलाने रहिवाशांना विनंती केली आहे. वीज कोसळल्याने लागलेल्या वणव्याने सॅनफ्रान्सिस्को शहराला तिन्ही बाजूने वेढलेले आहे.
सॅनफ्रान्सिस्कोमधील बे परिसरात तीन मोठे वणवे पेटले असताना घरापासून दूर राहण्याची तयारी करावी, असेही अग्निशमन दलाने रहिवाशांना सांगितले. परिसरात श्वास घेणे कठीण होत असून हवेत धुराचे लोट निर्माण झाले आहेत.
राज्यपाल गेविन न्यूसॉम म्हणाले, हा आठवडा हा अत्यंत कठीण असणार आहे. 14 हजारांहून अधिक फायर फायटर हे उत्तर कॅलिफॉर्नियामधील वणव्या विझविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही आग सॅनफ्रान्सिस्कोच्या तिन्ही बाजूला आहे. ही आग वीज कोसळल्याने गेल्या आठवड्यापासून लागलेली आहे. आम्ही अत्यंत वेगळ्या हवामानाच्या स्थितीशी सामना करत आहोत. यापूर्वी अशी आधुनिक इतिहासात कधीच स्थिती आली नव्हती, असे राज्यपाल गेविन यांनी सांगितले.
हवामान स्वच्छ निर्माण झाल्याने विमानांचे अधिक उड्डाणे करू शकल्याचे मार्क ब्रुन्टन यांनी सांगितले. ते कॅलिफॉर्नियाच्या जंगल आणि आग संरक्षण विभागाचे मुख्य अधिकारी आहेत. आग विझविण्यासाठी 7 लाख 57 हजार 82 लिटर पाण्याचा वापर हॅलिकॉप्टरमधून करण्यात आला आहे.