ETV Bharat / international

मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांना टोचवली कोरोना प्रतिबंधक लस - मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना टोचवली कोरोना लस

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून माहिती दिली. तसेच त्यांनी शास्त्रज्ञ, लस चाचणीत सहभाग घेणारे उमेदवार, आरोग्य कार्यकर्त्यांचे आभार मानले.

बिल गेट्स
बिल गेट्स
author img

By

Published : Jan 25, 2021, 2:49 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून माहिती दिली. 'वयाची 65 वर्ष गाठल्याचा एक फायदा म्हणजे, कोरोना लस घेण्यासाठी मी पात्र ठरलो. मला कोरोना लस टोचण्यात आली आहे. सर्व शास्त्रज्ञ, लस चाचणीत सहभाग घेणारे उमेदवार, आरोग्य कार्यकर्ते या सर्वांचे आभार', असे टि्वट बिल गेट्स यांनी केले आहे.

  • One of the benefits of being 65 is that I’m eligible for the COVID-19 vaccine. I got my first dose this week, and I feel great. Thank you to all of the scientists, trial participants, regulators, and frontline healthcare workers who got us to this point. pic.twitter.com/67SIfrG1Yd

    — Bill Gates (@BillGates) January 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अमेरिकेत 14 डिसेंबरपासून कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर लसीकरणाला सुरवात करण्यात आली होती. अमेरिकेत लसीकरणाची सुरुवात एका आरोग्य सेविकेला लस देऊन करण्यात आली होती.

2021 सालाच्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोस -

फायझर या लस निर्मिती करणाऱ्या कंपनीनं आपल्या जर्मन भागीदारी कंपनी बायोएनटेक सोबत मिळून लस विकसित केली आहे. या वर्षाअखेरपर्यंत 5 कोटी डोस आणि 2021 सालाच्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोस तयार करण्याचे ध्येय या कंपनीचे आहे.

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या -

अमेरिकेत रविवारी 25 मिलियन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर भारतीय आकडेवारीनुसार 2 कोटी 50 लाख 3 हजार 695 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच 4 लाख 17 हजार 538 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी नवे धोरण आखले आहे. तसेच त्यांनी मास्कचा वापरही बंधनकारक केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.