वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती आहे. यावेळी बायडेन यांनी रॅनसमवेअर हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे पुतीन यांना सांगितले. अमेरिकेत होत असलेल्या यांनी रॅनसमवेअर हल्ल्यांची माहिती पुतीन यांना दिली. या हल्ल्यांचा अमेरिकासह इतर देशांवर परिणाम होत असल्याचे बायडेन यांनी पुतीन यांना म्हटलं.
पुतीन यांच्याशी संवाद साधल्यानंतर बायडेन यांनी पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. रॅनसमवेअर हल्ले रशियाच्या भूमीतून घडत आहेत. त्यामुळे त्यांनी हल्लेखोरांवर कारवाई करावी. या हल्ल्यासंदर्भातील माहिती त्यांना देण्यात आली आहे. त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा असल्याचे बायडेन यांनी म्हटलं. तसेच आम्ही नियमित संभाषण सुरू आहे. जेणेकरून, दोन्ही देशांपैकी कोणालाही असे वाटले की एका देशातील कृतीचा परिणाम दुसऱ्यावर होत आहे. तेव्हा एकमेकांशी बोलले जाईल.
बायडेन यांनी रॅनसमवेअर हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी रशियाने पाऊले उचलण्याची गरज असल्याचे बाडयेन यांनी म्हटलं. रॅनसमवेअरमुळे उद्भवलेल्या मोठ्या धोक्याचा सामना करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अमेरिका आपल्या लोकांचे आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे बायडेन म्हणाले.
अमेरिकेत होणाऱ्या सायबर हल्ल्यांना रशियाला जबाबदार धरण्यात आले आहे. मात्र, रशियाने वेळोवेळी हे आरोप फेटाळले आहेत. जिनिव्हा येथे जो बायडेन यांची व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली. यावेळीही सायबर हल्ल्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये अमेरिकेत झाले ल्या सायबर हल्ल्यानंतर 10 रशियन मुत्सद्दी हद्दपार करण्यात आले होते. तसेच नवीन निर्बंध जाहीर केले होते.
काय असतो रॅनसमवेअर हल्ला?
रॅनसमवेअर म्हणजे ऑनलाइन जगातील खंडणीखोर असतात. संगणक प्रणाली किंवा स्मार्टफोनवर रॅनसमवेअर हल्ला केला जातो. या हल्ल्याचा धोका ठरावीक तांत्रिक प्रणालींना किंवा वापरकर्त्यांना जास्त असतो. हल्ला झाल्यानंतर फाईल एनक्रिप्ट होतात. त्यानंतर काही ठरावीक रक्कम अमुक एक खात्यात भरून आपण आपल्या फाइल्स आणि माहिती पूर्ववत करून घेऊ शकता असा संदेश दाखवला जातो. यालाच रॅनसमवेअर हल्ला म्हणातात. जगातील पहिला रॅनसमवेअर हा ‘एड्स ट्रोजन’ या नावाने ओळखला जातो. तो 1989 मध्ये झाला होता. रॅनसमवेअरसारखे हल्ले रोखण्यासाठी केवळ अत्याधुनिक यंत्रणा किंवा सॉफ्टवेअर सुरक्षा पुरेशी नसून याबाबत जनजागृती होणेदेखील तितकेच आवश्यक आहे.
भारतात दर आठवड्याला संस्थांवर सरासरी २१३ रॅनसमवेअरचे हल्ले-
गेल्या वर्षभरापासून दर आठवड्याला देशातील संस्थांवर सरासरी 213 रॅनसमवेअरचे हल्ले झाले आहेत.गतवर्षीच्या तुलनेत यंदा रॅनसमवेअरच्या हल्ल्यांचे प्रमाण १०२ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामध्ये कोणतीही घट होत नसल्याचेही दिसून आले आहे. वर्षाच्या प्रारंभी सर्वाधिक रॅनसमवेअरचे हल्ले उत्तर अमेरिकेमधील आरोग्य संस्थांवर झाले आहेत. रॅनसेमअरच्या हल्ल्यात भारतानांतर अर्जेंटिना, चिली, फ्रान्स आणि तैवान या देशांचा क्रमांक राहिला आहे.