ETV Bharat / international

H-1B व्हिसाबाबत नवी नियमावली लागू करणार बायडेन, ग्रीन कार्डबाबतही होणार मोठा निर्णय - बायडेन एच- वन बी व्हिसा मर्यादा वाढवणार

जो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनने भारतीय आयटी व्यावसायिकांसाठी लाभकारक ठरणारे आहे. बायडेन यांच्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये इमिग्रेशन रिफॉर्म (USA Immigration Reform) चा उल्लेख आहे. यामुळे H-1B व्हिसाबाबत काही मोठ्या निर्णयांची अपेक्षा आहे.

h-1b-visa-limit-and-remove-country-quota
H-1B व्हिसाबाबत नवी नियमावली
author img

By

Published : Nov 8, 2020, 4:36 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडेन निवडून येणे एच- वन बी व्हिसाधारकांसाठी चांगली बातमी होऊ शकते. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची योजना आहे, की अमेरिकेत एच- वन बी व्हिसाधारकांसह उच्च-कौशल्य व्हिसाची संख्या वाढवणे. बायडेन प्रशासनाने ही योजना अंमलात आणल्यास भारतातील हजारो आयटी प्रोफेशनल्सना लाभ मिळेल.

भारतीय वंशांच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यामळे अशी आशा केली जात आहे, की ट्रम्प प्रशासनाद्वारे एच- वन बी व्हिसाधारकांच्या पती/पत्नी च्या वर्क परमीट निर्णयाला बदलले जाईल. ट्रम्प प्रशासनाने प्रतिबंध लादल्यानंतर अमेरिकेत मोठ्या संख्येने राहणाऱ्या भारतीय कुटूंबांना त्रास सहन करावा लागला होता.

बायडेन यांच्या जाहीरनाम्यात आश्वासन -

एच- वन बी व्हिसा मुद्दा बायडेन प्रशासनाच्या इमिग्रेशन रिफॉर्मचा हिस्सा असेल. दरम्यान येणाऱ्या काळात हे स्पष्ट होईल की, हे सर्व निर्णय एक-एक करून घेतले जातात की एकाचवेळी घेतले जातात. बायडेन कॅम्पेनच्या पॉलिसी डॉक्युमेंट अनुसार, आधीपासूनच अमेरिकेत राहून काम करणाऱ्या लोकांचा उच्च कौशल्य अस्थायी व्हिसा काढून घेऊ नये. जर इमिग्रेशन सिस्टम उच्च कौशल्य असणाऱ्या कामगारांना काढून केवळ एंट्री-लेव्हलच्या कामगारांना प्रोत्साहन दिल्यास अमेरिकेच्या इनोवेशन आणि प्रतिस्पर्धेला धोका निर्माण होऊ शकतो.

भारतीय आणि चीनच्या आयटी प्रोफेशनल्सना होणार फायदा -

एच- वन बी व्हिसा अमेरिकेत उच्च कौशल्य प्राप्त वर्कर्सची संख्या वाढविण्यास मदत करतो. एच- वन बी व्हिसा एक नॉन-इमिग्रेंट व्हिसा आहे. यामुळे अमेरिकी कंपन्या परदेशी वर्कर्संना विशेष प्रकारच्या कामासाठी नियुक्त करतात. अनेक अमेरिकी कंपन्या भारत व चीनमधील हजारों लोकांना प्रतिवर्षी नोकरी देतात.

ग्रीन कार्ड व्हिसाची मर्यादा वाढू शकतो -

रोजगार आधारित व्हिसा ग्रीन कार्ड (Green Card) नावाने ओळखला जातो. यामुळे अमेरिकेत प्रवासी लोकांना कायद्याने स्थायी नागरिकता मिळते. सध्या प्रति वर्ष 1,40,000 ग्रीन कार्ड व्हिसा दिले जातात. बायडेन यांनी जाहीरनाम्यात याची संख्या वाढविण्याचे आश्वासन दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.