न्यूयॉर्क - मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी अमेरिकन अध्यक्षांचे नाव न घेता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या टीमचे कौतुक करताना ट्रम्प यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या टीममध्ये साथीच्या काळात सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांना रोखणारे किंवा विरोध करणारे कोणतेही बाह्य घटक नाहीत, असे गेटस् यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - वर्षाअखेर उपलब्ध होणार बायोएनटेक आणि फायझर कंपनीची कोरोना लस
गेट्स सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, 'मला वाटते की, बायडेन यांची टीम आरोग्यसेवा करणाऱ्या लोकांचा एक चांगला गट आहे. बाह्य घटकांना सार्वजनिक आरोग्याविषयी फारसे महत्त्व वाटत नाही. यावरून, असे दिसते की बायडेन यांची टीम चांगली आहे.'
गेट्स यांनी 90 टक्के परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळाल्यावरून फाईझर आणि मॉडर्ना लसींचेही स्वागत केले. ब्रिटनच्या अॅस्ट्रॅजेनेकाला मान्यता मिळाल्याविषयी विचारले असता, त्यांनी यालाही जास्त उशीर होणार नाही, असे म्हटले. नोव्हॅक्स आणि जॉनसन अँड जॉन्सन यांच्यासुद्धा लसी पुढच्या वर्षी लवकर येण्याची शक्यता आहे. या लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून संपूर्ण जगातील लोकांपर्यंत त्या पोहोचवणे सोपे होईल. याबाबत खूपच आशादायक स्थिती आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा - ...म्हणून बराक ओबामा यांच्या मनात भारताविषयी विशेष स्थान