ETV Bharat / international

Russia-Ukraine war : अमेरिकेने रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले - RussiaUkraine dispute

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 'लुगान्स्क पीपल्स रिपब्लिक (Lugansk Peoples Republic )' आणि 'डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक ( Donetsk Peoples Republic )' यांना स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून मान्यता देणाऱ्या दोन आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. यावर अमेरिककडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

Russia-Ukraine war
Biden announces sanctions against russian
author img

By

Published : Feb 23, 2022, 11:58 AM IST

नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ( Russian President Vladimir Putin ) आज अमेरिकेन रशियन बँका आणि उच्चभ्रूविरुद्ध कठोर आर्थिक निर्बंधांचे आदेश ( Biden announces sanctions against russian ) जारी केले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला करून आंतरराष्ट्रीय कायद्याचे खुलेआम उल्लंघन केल्याचे त्यांनी म्हटलं. युक्रेनवर रशियाने आणखी कारवाई केल्यास आणखी निर्बंध लादली जातील, असे बायडेन यांनी म्हटलं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसंदर्भात केलेल्या दाव्यांमुळे कोणीही मुर्ख बनणार नाही, असेही बायडने यांनी म्हटलं. तसेच पूर्वेकडे रशियाची वाढती उपस्थिती लक्षात घेत नाटो बाल्टिक मित्र देशांच्या संरक्षणासाठी अमेरिका अतिरिक्त सैन्य पाठवत असल्याचे बिडेन यांनी सांगितले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी संसदेत रशियाबाहेर लष्करी बळ वापरण्याची परवानगी मागितली. यानंतर रशियन संसदेच्या वरच्या सभागृहाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याची परवानगी दिली. त्यामुळे युद्धाची शक्यता कमालीची वाढली आहे. लष्करी बळाचा वापर करण्यास परवानगी मिळाल्याने रशियाचा युक्रेनवर हल्ला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील डोनेस्तक आणि लुगांस्क या रशियन समर्थित फुटीरतावादी प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. रशियाच्या या निर्णयामुळे तणाव आणखी वाढला आहे. युक्रेनवर हल्ला करण्यासंदर्भातील रशियाचे हे पहिले पाऊल आहे, असे बायडेन यांनी म्हटलं. नाटोला दिलेले आमचे वचन अढळ आहे. नाटो प्रत्येक इंच सीमेचे रक्षण करेल.रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. रशियाच्या विरोधात युक्रेनला लष्करी मदत देऊ, असे बायडेन यांनी म्हटलं.

रशिया-युक्रेन वाद -

सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मात्र, अनेक रशियन हे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाहीत. अशात युक्रेन आणि नाटो देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. युक्रेन आणि रशियामधील संघर्षाने आंतरराष्ट्रीय राजकरणात वादंग पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - Russia-Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्धाचा काय होईल भारतावर परिणाम? जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.