ETV Bharat / international

...म्हणून बराक ओबामा यांच्या मनात भारताविषयी विशेष स्थान

author img

By

Published : Nov 17, 2020, 12:42 PM IST

बराक ओबामा यांनी लिहिलेले अ प्रॉमिस्ड लँड हे पुस्तक सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या पुस्तकात त्यांनी भारताविषयी वाटणारे मत व विचार व्यक्त केले आहे.

बराक ओबामा
बराक ओबामा

वॉशिंग्टन- भारतासाठी मनात नेहमीच वेगळे स्थान राहिल्याचे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटले आहे. बालपणी इंडोनिशियामध्ये राहत असताना पौराणिक महाकाव्य रामायण आणि महाभारताने भारताचा प्रभाव पडल्याचे बराक यांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटले आहे.

बराक ओबामा यांनी लिहिलेले अ प्रॉमिस्ड लँड हे पुस्तक सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या पुस्तकात त्यांनी भारताविषयी वाटणारे मत व विचार व्यक्त केले आहेत.

बराक ओबामा यांनी काय म्हटले आहे पुस्तकात?

  • बराक ओबामा यांनी पुस्तकात म्हटले, की भारत विशाल देश आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक षष्ठांश लोकसंख्या, दोन हजारांहून अधिक वाशिंक गट आणि सातशेहून अधिक भाषा बोलल्या जातात.
  • अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून २०१० मध्ये भेट देण्यापूर्वी कधीही भारतात भेट दिली नव्हती. मात्र, माझ्या कल्पनेत भारताला नेहमी वेगळे स्थान राहिल्याचे ओबामा यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
  • विशाल देश असल्याने कदाचित भारताबद्दल मनात विशेष स्थान असू शकते. इंडोनिशियामध्ये लहानपणी रामायण आणि महाभारतामधील कथा ऐकल्यामुळे भारताबद्दल मनात विशेष स्थान असू शकते. पा
  • किस्तानी गट आणि कॉलेजमधील भारतीय मित्रांना दाळ आणि खीमा तयार करण्यासाठी शिकविले. त्यानंतर मी बॉलिवूड सिनेमांकडे वळालो, असे ओबामा यांनी पुस्तकात लिहिले आहे.

अ प्रोमिस्ड लँड पुस्तकात ओबामा यांनी २००८ मधील निवडणूक प्रचारापासूनचा आयुष्यातील प्रवास लिहिला आहे. ओसाबा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या सैनिकांनी ठार करेपर्यंतची ओबामा यांनी पुस्तकात माहिती दिली आहे. अ प्रॉमिस्ड लँड पुस्तक हे दोन भागात प्रकाशित होणार आहे. पुस्तकाचा पहिला भाग बुधवारी प्रकाशित होणार आहे.

भारतीय नेत्यांबद्दलही ओबामा यांनी व्यक्त केले मत-

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे चिंताग्रस्त आणि कमी योग्यतेचे नेते आहेत. त्यांना आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. मात्र, त्यांच्याकडे विषयामध्ये प्रभुत्व मिळवण्याची क्षमता आणि उत्कटतेची कमतरता असल्याने त्यांना अपयश येत आहे, असे ओबामा यांनी आपल्या 'ए प्रॉमिस्ड लँड' या पुस्तकामध्ये राहुल गांधींविषयी नमुद केले आहे. तसेच जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही त्यांनी भाष्य केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.