ETV Bharat / international

कोरोना 'पॉझिटिव्ह' महिलांनी दिले निरोगी बाळांना जन्म.. - पेरू कोरोना पॉझिटिव्ह महिला प्रसूती

या दोन्ही महिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अतिशय खबरदारी बाळगत ही प्रसूती पार पाडण्यात आली. तसेच बाळांच्या स्वॅब नमुन्यांचीही तातडीने तपासणी करण्यात आली. पहिल्या चाचणीमध्ये या दोन्ही बाळांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Babies born to COVID-19 mothers in Peru test negative for virus
कोरोना 'पॉझिटिव्ह' महिलांनी दिले निरोगी बाळांना जन्म..
author img

By

Published : Apr 9, 2020, 12:14 PM IST

लिमा : पेरु देशामध्ये कोरोनाची लागण झालेल्या दोन महिलांनी निरोगी बाळांना जन्म दिला आहे. या बाळांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना या विषाणूची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

एडगार्डो रेबाग्लियाटी मार्टिन्स नॅशनल रुग्णालयातील दोन महिलांची मार्च महिन्याच्या अखेरीस प्रसूती झाली होती. या दोन्ही महिलांची प्रसूती सीझरियन पद्धतीने करण्यात आली. यातील पहिल्या बाळाचा जन्म २७ मार्चला प्रसूतीच्या ३२ व्या आठवड्यात झाला होता. या बाळाचे वजन १ किलो ७७ ग्रॅम होते. तर, दुसऱ्या बाळाचा जन्म ३१ मार्चला प्रसूतीच्या ३८व्या आठवड्यात झाली होती. या बाळाचे वजन ३ किलो ३०० ग्रॅम होते.

या दोन्ही महिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अतिशय खबरदारी बाळगत ही प्रसूती पार पाडण्यात आली. तसेच बाळांच्या स्वॅब नमुन्यांचीही तातडीने तपासणी करण्यात आली. पहिल्या चाचणीमध्ये या दोन्ही बाळांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, दुसऱ्या तपासणीचे अहवाल येणे बाकी आहे.

दरम्यान, या दोनही महिलांना कोरोनावरील उपचारांसाठी विशेष कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : 'कोरोनावर राजकारण करणे थांबवा अन् जीव वाचवा'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.