वॉशिंग्टन डी. सी - इराणने अमेरिकेच्या हवाई तळावर केलेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पत्रकार परिषद घेतली. इराणने अणुशक्ती बनण्याचे स्वप्न सोडून द्यावे. मी अध्यक्ष असे पर्यंत इराणला कधीही अण्वस्त्रे ठेवण्याची मुभा दिली जाणार नाही. तसेच इराणवर अधिक कडक आर्थिक निर्बंध लादले जातील, असे ट्रम्प यांनी सांगितले. सुलेमानीला यापूर्वीच ठार मारायला हवे होते. तो अमेरिकेच्या यादीतला सर्वांत मोठा दहशतवादी होता, असे ट्रम्प म्हणाले.
इराणने अमेरिकेवर हल्ला केला तर अमेरिका इराणच्या ५२ ठिकाणांवर हल्ला करेल, असा पवित्रा ट्रम्प यांनी घेतला होता. मात्र, आता ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेतली असून आर्थिक निर्बंध लादण्याचा विचार सुरू केला आहे.
-
US President Trump: No Americans were harmed in last night's attack by the Iranian regime. We suffered no casualties. All our soldiers are safe, only minimal damages were sustained at our military bases. https://t.co/5dW17stxwk
— ANI (@ANI) 8 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">US President Trump: No Americans were harmed in last night's attack by the Iranian regime. We suffered no casualties. All our soldiers are safe, only minimal damages were sustained at our military bases. https://t.co/5dW17stxwk
— ANI (@ANI) 8 January 2020US President Trump: No Americans were harmed in last night's attack by the Iranian regime. We suffered no casualties. All our soldiers are safe, only minimal damages were sustained at our military bases. https://t.co/5dW17stxwk
— ANI (@ANI) 8 January 2020
इराणने केलेल्या हल्ल्यात कोणत्याही अमेरिकन नागरिकाचे नुकसान झाले नाही. आमचे सर्व सैनिक सुरक्षित आहेत. फक्त लष्करी तळांचे थोडे नुकसान झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
अमेरिकेकडे उत्कृष्ट लष्कराबरोबरच शस्त्रास्त्रही आहेत. मात्र, आम्ही त्याचा वापर करणार नाहीत. त्याचा वापर करण्याची आमची इच्छा नाही, असेही ट्रम्प म्हणाले.
लष्करी अधिकारी कासीम सुलेमानीला अमेरिकेने रॉकेट हल्ल्यात ठार केल्यानंतर इराणने याचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे. बगदादमधील अल-जदरीया आणि बलाद हवाई तळाबाहेर ५ जानेवारीला (रविवारी) इराणने अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले होते. अमेरिकी दूतावास असलेल्या भागातही रॉकेट हल्ला केला होता.
त्यानंतर इराणने जर परदेशातील अमेरिकेचे नागरिक किंवा मालमत्तेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका इराणमधील ५२ महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. हा हल्ला युद्ध थांबवण्यासाठी होता युद्ध सुरू करण्यासाठी नव्हता, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
दोन्ही देशातील वाद पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनीस्ट्रेशनने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या नागरी विमानांना इराक, इराण आणि पर्शियन गल्फच्या भूप्रदेशावरून उडण्यास बंदी घालण्यात आली आहे. इराणकडून नागरी विमानांना लक्ष्य केले जाऊ शकते, या भीतीने अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने हल्ल्याला प्रत्युत्तर न देण्याची धमकी इराणने दिली आहे. अमेरिकेने प्रदेशातील सर्व सैन्य काढून घ्यावे, अन्यथा हल्ले सुरूच राहतील, असा इशारा दिला आहे.