ETV Bharat / international

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या साडेसहा लाख; न्यूयॉर्क शहरात 15 मेपर्यंत लॉकडाऊन

author img

By

Published : Apr 16, 2020, 11:34 PM IST

एकट्या न्यूयॉर्क राज्यामध्ये 2 लाख 18 हजार रुग्ण आढळून आले आहेत, तर 16 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेत कोरोना संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. देशभरात रुग्णांचा आकडा साडेसहा लाखांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे न्यूयॉर्क शहरात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत 33 हजार 490 जणांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे 56 हजार रुग्ण उपचारानंतर पूर्णत बरे झाले आहेत. एकट्या न्यूयॉर्क राज्यामध्ये 2 लाख 18 हजार रुग्ण आढळून आले आहेत, तर 16 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात न्यूयॉर्कमध्ये सहाशे जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूजर्सी राज्यात 71 हजार रुग्ण आढळून आले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून पुरवल्या जाणारा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या निधीवर अमेरिका नियत्रंण आणणार असल्याचे म्हटले होते.

अमेरिकन प्रशासनला जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचे निर्देश दिले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. कोरोना विषाणूचा जगभरात प्रसार होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने चीनला अनुकूल अशी भूमिका घेतली आणि कोरोनाप्रसाराबाबत तथ्य लपवले. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराबद्दलची माहिती लपवणे आणि गैरव्यवस्थापन याबाबत जागतिक आरोग्य संघटनेची समिक्षा करण्यात येत आहे. समिक्षापूर्ण होईपर्यंत अमेरिका संघटनेला निधी पूरवणार नाही, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.