वॉशिंग्टन - अफगाणिस्तानातील शीख समुदायातील अमेरिकेत राहणाऱ्या शिखांनी भारताला मदतीचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानात शीख समुदायावर मोठ्या प्रमाणात अत्याचार आणि हिंसा होत आहे. अशा परिस्थितीला बळी पडलेल्या 650 कुटुंबांसाठी भारत सरकारकडे मदत मागणे, हाच एकमेव व्यवहार्य पर्याय असल्याचे या शिखांनी म्हटले आहे.
-
India has always stood in solidarity with the Sikh and Hindu community in Afghanistan and extended help and refuge in difficult circumstances. https://t.co/VWDAOJItU7
— Taranjit Singh Sandhu (@SandhuTaranjitS) April 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">India has always stood in solidarity with the Sikh and Hindu community in Afghanistan and extended help and refuge in difficult circumstances. https://t.co/VWDAOJItU7
— Taranjit Singh Sandhu (@SandhuTaranjitS) April 18, 2020India has always stood in solidarity with the Sikh and Hindu community in Afghanistan and extended help and refuge in difficult circumstances. https://t.co/VWDAOJItU7
— Taranjit Singh Sandhu (@SandhuTaranjitS) April 18, 2020
-
CHM @RepEliotEngel: Concerned for the safety of the Sikh community in Afghanistan, recently targeted by ISIS, and urge the Administration to consider Afghan Sikhs and Hindus for emergency refugee protection under the Fiscal Year 2020 U.S. Refugee Admissions Program. https://t.co/otsL7Wyac5
— House Foreign Affairs Committee (@HouseForeign) April 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">CHM @RepEliotEngel: Concerned for the safety of the Sikh community in Afghanistan, recently targeted by ISIS, and urge the Administration to consider Afghan Sikhs and Hindus for emergency refugee protection under the Fiscal Year 2020 U.S. Refugee Admissions Program. https://t.co/otsL7Wyac5
— House Foreign Affairs Committee (@HouseForeign) April 18, 2020CHM @RepEliotEngel: Concerned for the safety of the Sikh community in Afghanistan, recently targeted by ISIS, and urge the Administration to consider Afghan Sikhs and Hindus for emergency refugee protection under the Fiscal Year 2020 U.S. Refugee Admissions Program. https://t.co/otsL7Wyac5
— House Foreign Affairs Committee (@HouseForeign) April 18, 2020
अफगाणिस्तानातील काबुल, जलालाबाद आणि गाझीमध्ये राहणारे अल्पसंख्याक शीख स्वतःच्या जिवाच्या संरक्षणासाठी भारताकडे शरण मागत आहेत. अफगाण शीख समुदायाने भारताला असे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदूंना एकत्र करून त्यांना कायदेशीर आणि राजकीय शरण मिळावी अशी मागणी असे आवाहन त्यांनी केले आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या शीख समुदायाच्या नेत्यांनी अफगाणिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना लवकर मदत मिळणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. त्यांच्यासाठी भारत हे एकमेव सुरक्षित आश्रयस्थान आहे असे ते म्हणाले.
'कोरोना विषाणूमुळे पसरलेली महामारी पाहता भारत सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. आम्हाला भारताची चिंता समजत आहे. तरीही, आम्ही भारत सरकारने अफगाणी शीखांना आणि हिंदूंना वाचवण्यासाठी त्वरित कारवाई करावी, असा आग्रह करत आहोत. आम्हाला अफगाणिस्तानातील शिखांच्या सुरक्षेविषयी अत्यंत काळजी वाटत आहे,' असे अफगाणिस्तान सिख कमिटी ग्लोबल सिख कौन्सिलचे अध्यक्ष परमजित सिंह बेदी यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारने लवकरात लवकर या प्रकरणात लक्ष घालावे आणि काबुलहून भारतात येणाऱ्या एका विशेष विमानाची व्यवस्था करावी, अशी विनंती आम्ही करत आहोत, असे बेदी म्हणाले.
25 मार्चला काबुल येथील शीख गुरुद्वारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 शीख मारले गेले होते. हा हल्ला इसिस या दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. बेदी यांनी या घटनेचा उल्लेख करताना या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये महिला, वृद्ध आणि चार वर्षीय लहान मुलीचा समावेश असल्याचे सांगितले आहे. हे सर्व लोक कोरोना विषाणूने पीडित लोकांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी प्रार्थना करण्यासाठी गुरुद्वारामध्ये एकत्र आले होते. मात्र, धार्मिक कट्टरतावाद्यांमुळे त्यांना जीव गमवावा लागला.
अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी भारत अफगाणिस्तानातील शीख समुदायासोबत असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच, त्यांना कठीण परिस्थितीमध्ये मदत करण्याचे आश्वासन संधू यांनी दिले आहे.