ओटावा - कॅनडाच्या अल्बर्टा येथे हेलिकॉप्टर कोसळल्याने चार जण ठार झाले. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस (आरसीएमपी) यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा - नवीन वर्षाच्या उत्सवाच्या वेळी होंडुरासमध्ये 18 ठार
शनिवारी एका निवेदनात आरसीएमपीने सांगितले की, सकाळी आठच्या सुमारास खासगी हेलिकॉप्टर एका शेतात कोसळले. वृत्तसंस्था सिन्हुआच्या वृत्तानुसार, ठार झालेल्यांमध्ये एक जोडपे आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे.
या अपघाताची चौकशी सुरू आहे, आरसीएमपीने अधिक तपशील दिलेला नाही.
हेही वाचा - काबूल विद्यापीठावरील हल्ल्याच्या मास्टरमाइंडला फाशीची शिक्षा