ETV Bharat / international

मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकमधील सशस्त्र हल्ल्यात 3 संयुक्त राष्ट्र शांततासैनिक ठार, 2 जखमी

मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकमध्ये (Central African Republic - सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक) गुरुवारी अज्ञात बंदूकधार्‍यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 3 अधिकारी ठार आणि दोन जखमी झाले. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुतारेस यांनी मध्य आफ्रिकी रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांना या हल्ल्यांची चौकशी करावी आणि दोषींना त्वरेने न्यायपालिकेसमोर उभे करण्याचे आवाहन केले.

मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक न्यूज
मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक न्यूज
author img

By

Published : Dec 26, 2020, 5:27 PM IST

न्यूयॉर्क - मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकमध्ये (Central African Republic - सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक) गुरुवारी अज्ञात बंदूकधार्‍यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 3 अधिकारी ठार आणि दोन जखमी झाले, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी एका निवेदनात दिली. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुतारेस यांनी मध्य अफ्रिकी राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दलांवर झालेल्या या अज्ञात सशस्त्र हल्ल्याचा निषेध केला.

'सरचिटणीसांनी मृत शांती सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल, तसेच लोक आणि बुरुंडी सरकारबद्दल मनापासून संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना लवकर आरोग्य मिळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे,' असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - इथियोपियाची गृहयुद्धाच्या दिशेने वाटचाल.. देश अधोगतीच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांवरील हल्ल्यांमुळे युद्ध होऊ शकते, असाही इशारा गुतारेस यांनी दिला. त्यांनी मध्य आफ्रिकी रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांना या हल्ल्यांची चौकशी करावी आणि दोषींना त्वरेने न्यायपालिकेसमोर उभे करण्याचे आवाहन केले.

मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकमधील शांतता आणि स्थिरता वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसह एकत्र काम करत असलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या निरंतर प्रतिबद्धतेची पुष्टी गुतारेस यांनी दिली.

हेही वाचा - इथिओपियातील हल्ल्यात 100 हून अधिक लोक ठार : मानवाधिकार गट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.