ETV Bharat / international

तहव्वूर राणाला विमान प्रवासाचा धोका नाही, अमेरिकन कोर्टात वकिलांचे स्पष्टीकरण

मध्यवर्ती कॅलिफोर्नियातील अमेरिकेच्या जिल्हा न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी 30 जून रोजी राणाच्या बॉण्डची सुनावणी निश्चित केली आहे. सध्या भारत राणाची कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. खुनाचा कट रचणे, बनावट कागदपत्रांचे लिलाव करणे, बनावट सह्यांमार्फत मालमत्तेसंदर्भात फसवणूक करणे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये राणा संशयित आहे.

author img

By

Published : Jun 23, 2020, 8:03 PM IST

Mumbai terror attack
तहव्वूर राणाला विमान प्रवासाचा धोका नाही, अमेरिकन कोर्टात वकिलांचे स्पष्टीकरण

वॉशिंग्टन - मूळचा पाकिस्तानी असलेल्या कॅनडीयन उद्योजक तहव्वूर राणा याला लॉस एन्जेलिस मध्ये अटक करण्यात आली. अनेक दिवसांपासून भारतीय गुप्तचर यंत्रणांना त्याचा शोध होता. तहव्वूर राणाचा सहभाग २००८ साली झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात होता. याबाबत भारत सरकारने त्याची कस्टडी मागितली आहे. याबाबत वकिलांनी अमेरिकन कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत राणाला कोणताही हवाई उड्डाणाचा धोका नसल्याचे सांगितले. तसेच त्याच्या सुटकेसाठी १.५ मिलियनचा बॉन्ड देऊ केला आहे.

मध्यवर्ती कॅलिफोर्नियातील अमेरिकेच्या जिल्हा न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी 30 जून रोजी राणाच्या बॉण्डची सुनावणी निश्चित केली आहे. सध्या भारत राणाची कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. खुनाचा कट रचणे, बनावट कागदपत्रांचे लिलाव करणे, बनावट सह्यांमार्फत मालमत्तेसंदर्भात फसवणूक करणे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये राणा संशयित आहे.

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने तुरुंगाबाहेर पडलेल्या राणाला भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनुसार लॉस एन्जेलिसमध्ये पुन्हा अटक करण्यात आली. लष्कर-ए-तैयब्बा या आतेरिकी संघटनेशी संबंधित असलेल्या डेवीड हेडली सोबत त्याने मुंबईतील आतेरिकी हल्ल्याचा कट रचल्याचे सुनावणीदरम्यान न्यायाधिश कार्लिन यांनी अधोरेखित केले. डेवीड हेडली राणाचा लहाणपणीचा मित्र असल्याचे यामध्ये स्पष्ट झाले.

'प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेनंतर राणा जामिनास पात्र असल्याचे दाखवू शकतात', असा युक्तिवाद करत वकिलांनी त्याच्या सुटकेत असणाऱ्या जोखमीची चिंता सादर करत असलेल्या दोन्ही बॉन्डमुळे कमी होईल, असे म्हटले. प्रत्यार्पणाला सामोरे जाताना आरोग्यासंबंधी धोका राणा यांना भेडसावत आहे. यासाठी राणाच्या वकिलांनी कोरोनाचे कारण पुढे केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.