मेक्सिको सिटी - मेक्सिको देशात अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली असून यात दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला आणि दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. जेलिल्को शहराच्या पश्चिमेकडील एका घरावर हा हल्ला झाला. कारमधून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
मेक्सिकोतील जलिस्को राज्यात ही घटना घडली. घराबाहेर दहा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पोलिसांना दिसले. जेलिस्को 'न्यू जनरेश कार्टेल' ही गुन्हेगारी संघटना या भागात सक्रीय असून हे ठिकाण अनेक मोठ्या गुन्ह्यांचे केंद्र बनले आहे. मागील काही वर्षात गोळीबाराच्या, खून मारामारीच्या अनेक घटना जेलिस्को राज्यात घडल्या आहेत.