त्रिपोली - लिबियाची राजधानी त्रिपोलीच्या दक्षिणेस सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेरहुना शहरात सामूहिक थडग्यांमधून 12 अज्ञात मृतदेह आढळल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हे मृतदेह ताब्यात घेत असल्याचे लिबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील नवीन सामूहिक कबरीमधून मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती जनरल अथॉरिटी फॉर रिसर्च अँड आयडेंटिफिकेशन ऑफ मिसिंग पर्सन्सचे प्रवक्ते अब्दुल-अजीज जाफरी यांनी रविवारी सिन्हुआला दिली.
हेही वाचा - व्हिएतनाममधील पूर आणि भूस्खलनामुळे 90 जणांचा मृत्यू, 34 बेपत्ता
'जूनमध्ये या कबरीचा शोध लागल्यापासून तेरहुनात एकूण 86 मृतदेह सापडले आहेत. तर, त्रिपोलीमध्ये आतापर्यंत 28 मृतदेह सापडले आहेत,' असे जाफरी म्हणाले.
संयुक्त राष्ट्र-समर्थित लिबियातील सरकारी सैन्याने तेरहुनामध्ये पूर्वेकडील विरोधक सैन्यावर सामूहिक हत्येचा आरोप ठेवला आहे. या सैन्यांदरम्यान झालेल्या लढाईत शेकडो नागरिक ठार झाले. अनेक जखमी आणि दीड लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.
हेही वाचा - 551 व्या नानक जयंतीदिवशी पाकचे भारतीय शिखांना आमंत्रण