अबुजा - नायजेरियामध्ये शांततापूर्ण सुरू असलेल्या सभांवर पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी या सभा सुरू असताना पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती एमनेस्टी इंटरनॅशनलकडून देण्यात आली.
अनिश्चित काळासाठी कर्फ्युच्या विरोधात नायजेरियातील सर्वात मोठ्या शहरात जमलेल्या निदर्शकांवर पोलिसांनी गोळीबार केला. गोळीबारावेळी घटनास्थळी शेकडो नागरिक उपस्थित होते. मंगळवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नायजेरियाच्या सरकारने दरोडाविरोधी पथक बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हॅशटॅगिंडार येथून या निषेधाला सुरुवात झाली. या पथकास सार्स (एसएआरएस) म्हणून ओळखले जाते. नायजेरियामध्ये अधिक चांगले प्रशासन मिळावे यासाठी लोक बराच काळापासून मागणी करीत आहेत.
हेही वाचा - नासाच्या 'ओसिरिस-रेक्स'ने फोडला लघुग्रहावरील खडक!
पोलीस प्रशासनाने ट्विट करून गोळीबार झाला त्यावेळी तेथे पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे सांगितले आहे. या गोळीबाराची चौकशी केली जाईल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.