ETV Bharat / international

ब्राझीलमध्ये २० लाख कोव्हिशिल्ड लसीचे डोस विमानाने दाखल

" मेड इन इंडिया कोरोना लस ब्राझीलमध्ये दाखल, असे ट्विट परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले. काल (शुक्रवार) विशेष विमानाने लस पाठविण्यात आली होती.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 23, 2021, 7:08 AM IST

नवी दिल्ली - भारतीय बनावटीच्या 'कोव्हिशिल्ड' लसीचे २० लाख डोस आज (शनिवार) ब्राझीलमध्ये दाखल झाले. "मेड इन इंडिया कोरोना लस ब्राझीलमध्ये दाखल, असे ट्विट परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले. शुक्रवारी विशेष विमानाने लस ब्राझीलला पाठविण्यात आली होती.

भारत सरकारचे मानले आभार -

कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिबंधात्मक लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका कंपनीकडून तयार करण्यात आली आहे. तर भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये लसीचे उत्पादन सुरू आहे. ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील दुतावास कार्यालयाशी समन्वय साधून लस वाहतुकीची व्यवस्था केली. ब्राझीलचे राजदूत आँद्रे अर्न्हा यांनी लसीचा पुरवठा केल्याबद्दल सीरम कंपनीचे आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत. तसेच वाहतुकीवेळी सुत्रबद्ध नियोजन केल्यामुळे कंपनीचे कौतुक केले.

मित्र देशांना कोरोना लसीचा पुरवठा -

कोरोना लसीकरणासाठी भारताने शेजारी देशांसह मित्र देशांना लसीचा पुरवठा सुरू केला आहे. म्यानमार, सेशल्स आणि मॉरिशस या देशांना काल (शुक्रवार) सीरम कंपनीच्या 'कोव्हिशिल्ड' लसीचा पुरवठा केला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून ही लस या देशांना पाठविण्यात आली. नेपाळ, भूटान, अफगाणिस्तान, बांगलादेशलाही भारताकडून कोरोना लस देण्यात येत आहे.

काल सकाळी साडेसहाच्या सुमारास म्यानमारला विशेष विमानाने लस पाठवण्यात आली. तर मॉरिशस आणि सेशल्स या देशांना सकाळी ११ वाजता विमानाने लस पाठवण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ लाख लसींचे डोस म्यानमारला देण्यात आले आहेत. तर सेशल्सला ५० हजार डोस भारताकडून मिळाले. मॉरिशसला भारताकडून १ लाख कोरोना लसीचे देण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.