ETV Bharat / international

नायजेरियात ख्रिस्ती लोकांचा वांशिक, धार्मिक नरसंहार; बोको हरामसह इस्लामी दहशतवादी संघटनांकडून हत्याकांड

author img

By

Published : Dec 18, 2020, 6:32 PM IST

नायजेरियातील ख्रिश्चन लोकांच्या हत्याकांडाचे वर्णन अनेकजण 'पसरत जाणारा धार्मिक आधारावरील नरसंहार' असे करत आहेत. मुस्लीम दहशतवादी गट अनेक आफ्रिकन देशांमध्ये हल्ले करीत आहेत. आफ्रिकेतील 'मोस्ट वॉन्टेड व्यक्ती' असलेला अबूबाकर शेकाऊ हा इस्लामिक दहशतवादी गट बोको हरामचा म्होरक्या आहे. याने केवळ उत्तर नायजेरियालाच नाही तर, संपूर्ण प्रदेशाला अस्वस्थ केले आहे. अंगरक्षकांनी वेढलेला बोको हरामचा नेता अबूबाकर याने 'तो कधीही अडकला जाणार नाही, कारण तो अल्लाहचे कार्य करीत आहे,' अशी दर्पोक्ती केली आहे. शेकाऊच्या दानवी कृत्यांमुळे हजारो लोक ठार झाले आणि लाखो लोकांना त्यांच्या घरातून परागंदा व्हावे लागले.

नायजेरियात ख्रिस्ती लोकांचा वांशिक, धार्मिक नरसंहार

इस्लामी दशतवादी संघटना बोको हरामच्या सदस्यांनी 110 नायजेरियन शेतकऱ्यांची हत्या केल्याचा संशय

  • इस्लामी दशतवाद्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी नायजेरियात 110 भात उत्पादक शेतकरी आणि मच्छिमारांच्या हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
  • स्थानिक लोकांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर याचा सूड म्हणून बोको हरामच्या सदस्यांनी हा हल्ला गारिन क्वाशेबे येथे केला.
  • नायजेरियनचे अध्यक्ष मुहम्मू बुहारी यांनी शोकग्रस्त कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त करत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.
  • बोको हरामचा सदस्य असलेल्या एका बंदूकधाऱ्याने शेतकऱ्याला पैसे मागितले तसेच, त्याच्यासाठी जेवण बनवण्यास सांगितले. तो जेवण तयार होण्याच्या प्रतीक्षेत होता. दरम्यान, तो शौचालयात गेला असता, शेतकऱ्यांनी त्याची रायफल हिसकावून त्याला पकडले आणि बांधून ठेवले.
  • नंतर त्यांनी त्याला सुरक्षा रक्षकांच्या स्वाधीन केले.
  • परंतु दुर्दैवाने, सुरक्षा दलांनी या धाडसी शेतकर्‍यांचे संरक्षण केले नाही.
  • शेतकऱ्यांच्या या धाडसासाठी आणि त्यांची वाढलेली हिंमत पाहून, बोको हरामच्या सदस्यांनी एकत्र येत त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या शेतात त्यांच्यावर हल्ला चढवला.
  • गेल्या काही वर्षांत नायजेरियात हिंसाचार वाढला आहे. कारण, इस्लामी संघटनांचे दहशतवादी आणि फुलानी या कट्टरपंथी समाजातील मुस्लीम देशावर कब्जा करण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत. या जमातीचे कट्टरतावादी मुस्लीम तेथील निर्दोष लोकांचे अपहरण आणि हत्या करत आहेत.
  • ऑगस्टमध्ये दक्षिण नायजेरियातील कद्दुना राज्यात पाच ख्रिश्चन समुदायांवर या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये 33 लोक ठार झाले.
  • जुलैमध्ये दोन वेगवेगळ्या प्रसंगांत बंदूकधारी सशस्त्र हल्लेखोरांनी 50 लोकांना ठार केले. तर, अनेकजण जखमी झाले.
  • 2020 च्या पहिल्या सात महिन्यांत दहशतवाद्यांनी 1 हजार 400 हून अधिक नायजेरियन ख्रिश्चनांची क्रूरपणे हत्या केली.
  • ओपन डोअर्सच्या 2020 वर्ल्ड वॉचमध्ये ख्रिश्चन लोकांचा जगभरात छळ होण्याच्या घटना घडणाऱ्या देशांमध्ये नायजेरिया 12 व्या स्थानावर आहे. मात्र, ख्रिस्ती लोकांच्या हत्या होण्याच्या बाबतीत पाकिस्ताननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ख्रिश्चन लोकांना त्यांची ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा असल्याच्या कारणावरून ठार केले जात आहे.

    बोको हरामच्या सदस्यांनी 110 नायजेरियन शेतकऱ्यांची हत्या केल्याचा संशय

वांशिक आधारावर हत्या

  • 2012 पासून, 'जेनोसाईड वॉच'ने नायजेरियातील बोको हराम या लोकांची कत्तल करत सुटलेल्या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर नरसंहाराबाबत इशारा जारी केला आहे.
  • बोको हराम हा जगातील सर्वाधिक प्राणघातक आणि हत्याकांडे घडवून आणणारा गट आहे. या संघटनेने आतापर्यंत किमान 27 हजार लोकांच्या हत्या केल्या आहेत. बोको हरामने आता इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हाईन्ससोबत (ISWAP - इस्वॅप) निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा केली आहे.
  • 2020 पर्यंत, जेनोसाईड वॉचने असे म्हटले होते की, फुलानी जिहादी 'वांशिक आधारावर हत्याकांडे' घडवून आणत आहेत. ही संज्ञा व्यक्तीच्या 'ओळख'आधारित हत्येशी संबंधित आहे. मात्र, अशा हत्या कोणत्याही केंद्रीकृत संघटनेशिवाय केल्या जात असल्याचे दर्शविते.
  • 'वांशिक आधारावर नरसंहार' जशा पद्धतीने बोको हरामने आरंभला आहे, तो तशा पद्धतीने घडवून आणण्यासाठी संघटना आवश्यक आहे. याशिवाय हे शक्य नाही. याचे कारण असे की, वांशिक आधारावर हत्या घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय, सांस्कृतिक, वांशिक किंवा धार्मिक गट नष्ट करणे ही बाब 'हेतूपूर्वक' घडवून आणली जाते
  • जर एखादे राष्ट्र किंवा संस्था, जरी बोको हरामसारखे नरसंहाराचे आदेश देत असेल तरी त्यांचे हेतू सिद्ध करणे दोन मार्गांनी शक्य आहे.
  1. नेत्यांकडून दिले जाणारे आदेश; किंवा
  2. कारवायांचा साधारण आराखडा किंवा पद्धत ज्यांच्या परिणामांवरून दिसून येते की, ते समन्वयित आहेत किंवा मुद्दाम विशिष्ट हेतूंनी घडवून आणलेले आहेत.

फुलानी जिहादींच्या कारवाया

  • एकोणिसाव्या शतकात, फुलानी जिहादींनी सोकोटो सल्तनतद्वारे आयोजित अभियानांतर्गत संपूर्ण नायजेरियामध्ये इस्लामचा प्रसार केला.
  • हौसा या मूळ आफ्रिकन संस्कृतीला धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले. आता पश्चिम आफ्रिकेत 25 दशलक्ष फुलानी आहेत. यापैकी नायजेरियात 15 दशलक्ष आहेत.
  • फुलानी सशस्त्र दशतवादी गटांनी केलेल्या नायजेरियात नरसंहारांमध्ये 2016 पासून तब्बल दोन हजारांहून अधिक ख्रिस्ती लोकांना ठार मारले आहे. त्यांनी निवडकपणे या ख्रिस्ती लोकांना ठार मारले. म्हणूनच जेनोसाईड वॉच याला 'वांशिक आधारावर केले हत्याकांड' असे म्हटले आहे. अशा हत्याकांडात एखाद्या धार्मिक गटाच्या सदस्यांना लक्ष्य केले जाते.
  • हा जाणीवपूर्वक केलेला वांशिक नरसंहार असल्याचे नाकारणारे या हत्याकांडाला पारंपरिक प्राण्यांचे कळप बाळगणारे आणि शेतकरी यांच्यातील वादातून झालेल्या हत्या असल्याचे स्पष्टीकरण करतात.
  • परंतु, 2000 पासून हा संघर्ष खूपच घातक आणि जीवितास धोकादायक झाला आहे. फुलानी सशस्त्र दहशतवादी आता एके-47 चा वापर करतात आणि ट्रकमधून अनेक ठिकाणी जातात.
  • ते आता संपूर्ण ख्रिश्चन गावांचा नायनाट करतात. ते फक्त ख्रिस्ती लोकांनाच मारतात. ते मुस्लीम गावे आणि मुस्लिमांना सोडून देतात.
  • या गुन्हेगारीला 'वांशिक आधारावर केलेला नरसंहार' म्हणण्याने फरक पडतो. अमेरिकन कॉंग्रेस व युरोपियन संसदेच्या ठरावांनुसार अशा प्रकारचे 'वांशिक नरसंहार' इसिस ही दहशतवादी संघटना घडवून आणत होती. या इसिसचा लष्कराने पराभव केला. वांशिक नरसंहार हा त्या कृतीवरून आलेला शब्द आहे.
  • नायजेरियाचे अध्यक्ष बुहारी आणि नायजेरियन सरकार फुलानी हत्याकांडाला पाठिंबा देतात, याबाबतचा पुरावा अपुरा आहे. पण बुहारी हे 'बायस्टँडर' किंवा बाजूला राहून त्रयस्थपणे वांशिक नरसंहारांकडे पाहात असल्याचे दिसते. त्यांच्या सरकारने हे रोखण्यासाठी पुरेसे काम केले नाही.
  • बोको हराम आणि फुलानी जिहादी सक्रिय असलेल्या भागात अत्यंत हालाखीची परिस्थिती आहे. परंतु, गरिबी आणि त्यामुळे वाढते गुन्हेगारीचे क्षेत्र ही या नरसंहारासाठी ची सबब होऊ शकत नाही. हे वांशिक नरसंहार बंद करणे आवश्यक आहे.

'जेनोसाईड वॉच'ची शिफारस -

  • अमेरिकेच्या चौकशी आयोगाने या हत्याकांडांची चौकशी करण्यासाठी नायजेरियात जायला हवे.
  • आयोगाने संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषद आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद यांना अहवाल द्यावा.
  • नायजेरियातील चर्चनी नरसंहाराचा इशारा देण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी मानवी हक्क केंद्रे तयार केली पाहिजेत.
  • मुत्सद्दी मोहिमांच्या माध्यमातून नायजेरियन सरकारला नरसंहार रोखण्यासाठी ठोस कृती करण्याची विनंती केली पाहिजे.
  • नायजेरियन कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकाऱ्यांना दोषींना शोधून काढण्यात आणि त्यांना पकडण्यात मदत केली पाहिजे.
  • नायजेरियन पोलीस आणि सैन्य यांना प्रशिक्षित केले पाहिजे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यास कठोरपणे प्रतिबंधित केले पाहिजे.
  • जिहादींना पराभूत करण्यासाठी इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिका स्टेटस (ECOWAS - इकोवास) च्या समन्वित मोहिमेला आफ्रिकन युनियन, यूएस, नाटो, इस्लामिक सहकार संघटना आणि यूएनचे पाठबळ असले पाहिजे.

नायजेरियातील वांशिक नरसंहार तेथील ख्रिस्ती लोकांचा नायनाट करणारे किंवा त्यांना देशाबाहेर जायला भाग पाडणारे नवीन हत्यार ठरत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

नायजेरियाच्या उत्तर आणि मध्य पट्ट्यामधील ख्रिश्चन खेड्यांविरुद्ध हल्ले मोठ्या प्रमाणात चालूच असल्याने हिंसा हे अघोषित जिहादचे वैशिष्ट्य आहे, असे यूके-आधारित रिलीज इंटरनॅशनलचे म्हणणे आहे.

जिहाद

  • सशस्त्र फुलानी दहशतवादी ख्रिश्चन ग्रामस्थांना बाहेर हाकलून लावत आहेत. यामुळे 1800 च्या दशकातील फुलानी जिहादचे पुनरुज्जीवन होण्याची भीती निर्माण झाली आहे.
  • परंतु आजच्या काळात झालेला एक मोठा फरक म्हणजे प्राणघातक हल्ल्यांसाठी रायफल आणि मशीन गनचा वापर. तसेच, दहशतवाद्यांच्या शस्त्रास्त्रांत नवीन भर पडलेले शस्त्र म्हणजे ख्रिश्चन खेड्यांना जाळून टाकण्याचा वेग वाढवण्यासाठी वापरण्यात येत असलेली रसायने.
  • फुलानी जिहादी पेट्रोल बॉम्बमध्ये घातक रसायने वापरत आहेत.
  • हल्ल्यामध्ये सापडलेल्या समुदायांतील धर्मगुरुंनी ही रसायने वापरल्याचे पुरावे पाहिले आहेत.
  • या रसायनांमुळे फक्त धातूची छपरेच जळत नाहीत; तर, त्यामुळे इमारतींना लावलेले प्लॅस्टरही सोलले जाते.
  • सध्या सुरू असलेले हल्ले हा नायजेरियातील ख्रिश्चनांविरूद्ध अघोषित जिहादचा भाग आहे.

हिंसेचे प्रमाण

  • हल्ल्यांचे प्रमाण चिंताजनक आहे.
  • जेनोसाईड वॉचच्या मते, एका वर्षापेक्षा कमी कालावधीत हिंसक हल्ल्यांमध्ये 5,100 पेक्षा जास्त नायजेरियन मारले गेले.
  • स्वयंसेवी संस्था इंटरसोसायटीच्या अंदाजानुसार ‘दररोज सुमारे पाच ख्रिस्तींचा मृत्यू’ होत आहे.
  • 2019 मध्ये, इंटरसोसायटीच्या गणनेनुसार, फुलानी दहशतवाद्यांनी 1000 ते 1200 च्या दरम्यान ख्रिश्चनांना ठार मारले आहे.
  • ग्लोबल टेररिझम इंडेक्स (2019) नुसार फुलानी दहशतवाद्यांनी फक्त 2018 मध्ये 2000 हून अधिक लोकांना ठार मारले. हे बोको हराम दहशतवादी संघटनेने केलेल्या हिंसाचाराच्या सहापट भयानक आणि प्राणघातक आहे.
  • हिंसेच्या धार्मिक परिमाणांच्या पुराव्यात पाद्री आणि चर्च यांना लक्ष्य करणे आणि कब्जा केलेल्या गावांची नावे बदलून त्यांची इस्लामिक नावे ठेवणे याचा समावेश आहे.

ख्रिश्चनांच्या नरसंहाराकडे पाश्चात्य जगताची डोळेझाक

  • पाश्चिमात्य जग त्यांच्यावर इस्लामोफोबिक (इस्लामविरोधी किंवा इस्लामचा तिटकारा असलेले किंवा इस्लामबाबत पूर्वग्रह असलेले) असा शिक्का मारला जाण्याच्या भीतीने या हिंसाचाराच्या धार्मिक परिमाणाकडे डोळेझाक करत आहे.
  • पाश्चिमात्य लोक इस्लाम किंवा मुस्लिमांचा संबंध असलेल्या आणि धर्माशी संबंधित असलेल्या कोणत्याही संघर्षापासून कंटाळले आहेत. इराक युद्धातून आणि इस्लामोफोबियाच्या मुद्द्यावरून हे सहज समजण्यासारखे आहे.
  • धर्मनिरपेक्षतेच्या चष्म्यातूनच पश्चिमात्य जग अनेकदा या संघर्षाचा विचार करते.
  • 2000 च्या दशकात उत्तरेकडील 12 राज्यांनी शरिया (इस्लामिक कायदा) स्वीकारण्यासाठी हिंसाचाराचा उदय झाला होता.
  • या हल्ल्यांमुळे गावेच्या गावे उद्ध्वस्त होत आहेत. तसेच, कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास रात्री महिला आणि लहान मुलांना ठार करण्यात येत आहे.

धार्मिक परिमाण

  • अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने नायजेरियाला धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनाच्या दृष्टीने ‘विशेष चिंताजनक स्थिती असलेला देश’ म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या 2020 च्या नायजेरिया अहवालात हे जाहीर करण्यात आले आहे.
  • धार्मिक आणि पारंपरिक नेत्यांवर आणि उपासनास्थळांवर झालेल्या अनेक गुन्हेगारी हल्ल्यांची नोंद झाल्याचे अहवाल आहेत.
  • 2019 मध्ये शेकडो अपहरणांच्या घटनांच्या लाटेत मीडियाने खंडणीसाठी प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक पंथाच्या धर्मगुरूंच्या अपहरण आणि हत्यांच्या असंख्य घटनांची नोंद घेतली आहे आणि अहवालही दिले आहेत.
  • ख्रिश्चनांविरोधातील हिंसाचार हा एक धार्मिक आधारावर करण्यात आलेला नरसंहार बनला आहे.

जेनोसाईड - वांशिक, धार्मिक आधारावर नरसंहार

  • अनेकजण याचे एक 'पसरत जाणारा धार्मिक आधारावरील नरसंहार' (unfolding genocide) म्हणून वर्णन करीत आहेत. लोक दररोज मरत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने याला 'वांशिक, धार्मिक आधारावरील नरसंहार' (जेनोसाईड) म्हणून मान्यता देण्यापूर्वी आणखी किती जणांना मरणाच्या दारात जाण्याची गरज पडणार आहे?
  • नायजेरिया सरकार हे हल्ले होत असताना आपल्या देशातील असुरक्षित ख्रिश्चन समुदायाचे रक्षण करण्यासाठी पुरेशी पावले उचलत नाही.
  • सुरक्षेचा अभाव गावकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्रे हातात घ्यायला भाग पाडत आहे. ज्यामुळे हल्ले आणि त्यांच्या प्रतिकारांच्या दुष्परिणामांचे चक्र तयार होऊ शकते.
  • परंतु, जोपर्यंत लोकांना असुरक्षित वाटेल आणि सरकार संरक्षण देत नाही, तोपर्यंत ते स्वतःच स्वतःचे संरक्षण करणारच.
  • मोठ्या प्रमाणात सशस्त्र फुलानी दहशतवादी अपहरण आणि गुन्हेगारी कृत्ये करत असल्याने येथील अराजकता वाढत आहे.
  • आता एके-47 सह बरेच जण दरोडेखोरी आणि अपहरणे करत आहेत. जेव्हा ते खेड्यापाड्यांवर हल्ले करीत नाहीत, तेव्हा ते पैसे मिळवण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या गाड्या थांबवतात आणि लोकांचे अपहरण करतात. यामुळे येथे वाटामारी आणि प्रवाशांना लूटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
  • क्वचितच एखादा आठवडा ख्रिश्चन लोकांच्या खेड्यांवरील हल्ल्यांच्या घटनांशिवाय आणि बातम्यांशिवाय जातो.

ख्रिश्चन लोकांचा धार्मिक आणि वांशिक नरसंहाराचे लोण अफ्रिकेत मोठ्या प्रमाणात पसरतेय

  • मुस्लीम दहशतवादी गट अनेक आफ्रिकन देशांमध्ये हल्ले करीत आहेत.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे नायजेरिया, जेथे संपूर्ण खंडातील सर्वांत मोठा ख्रिश्चन लोकांचा नरसंहार झाल्याचे मानवी हक्क कार्यकर्ते म्हणतात. या नरसंहारात येथे अक्षरशः हजारो ख्रिश्चनांचा मृत्यू झाला आहे.
  • नायजेरियाच्या सैन्याने अलीकडेच त्यांच्या पहिल्या 100 दहशतवादी लक्ष्यांचे पोस्टर प्रकाशित केले.
  • आफ्रिकेतील 'मोस्ट वॉन्टेड व्यक्ती' असलेला अबूबाकर शेकाऊ हा इस्लामिक दहशतवादी गट बोको हरामचा म्होरक्या आहे. याने केवळ उत्तर नायजेरियालाच नाही तर, संपूर्ण प्रदेशाला अस्वस्थ केले आहे.
  • अंगरक्षकांनी वेढलेला बोको हरामचा नेता अबूबाकर याने 'तो कधीही अडकला जाणार नाही, कारण तो अल्लाहचे कार्य करीत आहे,' अशी दर्पोक्ती केली आहे.
  • शेकाऊच्या दानवी कृत्यांमुळे हजारो लोक ठार झाले आणि लाखो लोकांना त्यांच्या घरातून परागंदा व्हावे लागले.

शेकाऊची मोहीम आणि लक्ष्य

  • आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देशाचे इस्लामीकरण करणे आणि येथील अर्धी लोकसंख्या असलेल्या ख्रिश्चनांना एकतर हाकलून लावणे किंवा त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतरण करणे किंवा मारून टाकणे.
  • नायजेरिया आणि आसपासच्या देशांमधील दहशतवादी इतर बंडखोरी कृत्यांसह ख्रिश्चन समुदायाचा नरसंहार करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीत आहेत. त्यांना या सर्वांचा समूळ नाश करायचा आहे.
  • नायजेरियाचे अधिकारी बोको हरामला देशात 60,000 महिला विधवा आणि लहान मुले अनाथ झाल्याबद्दल दोषी ठरवतात.
  • येथील परिस्थिती अधिकच बिघडवण्यासाठी आणखी एक बाब कारणीभूत आहे. नायजेरियातील तथाकथित 'मधल्या पट्ट्यातील' प्रदेशात, जेथे उत्तर भागातील मुस्लीम आणि दक्षिण भागातील ख्रिश्चन लोकांचा भूप्रदेश एकमेकांना भिडतो, तेथे मुस्लीम फुलानी दहशतवाद्यांच्या आणखी एका गटाची ख्रिश्चनांना भीती आहे.
  • फुलानी दहशतवाद्यांनी 2020 च्या पहिल्या सात महिन्यांत 1 हजार 400 हून अधिक ख्रिश्चनांना ठार केले आहे.

हेही वाचा - नायजेरियात निषेध प्रदर्शनादरम्यान 69 निदर्शक ठार, राष्ट्राध्यक्षांचा वृत्ताला दुजोरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.