ETV Bharat / headlines

ट्रकने 12 वर्षीय मुलीला चिरडले, नागरिकांनी चालकाला केले पोलिसांच्या स्वाधीन - gondia latest news

घटनेनंतर चालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, गावकऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखवत ट्रकचा पाठलाग करून ट्रकला देवाडी रस्त्यावर रेल्वे गेटजवळ पकडले. नागरिकांनी चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

कीर्ती पुंडे अपघाती मृत्यू न्यूज
कीर्ती पुंडे अपघाती मृत्यू न्यूज
author img

By

Published : Jun 2, 2020, 1:07 PM IST

गोंदिया - तुमसर-गोंदिया रस्त्यावरील मांगली गावाजवळ ट्रकने चिरडल्याने एका 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

मध्यप्रदेशच्या भोपाळहून रायपूरला निघालेल्या एच आर 55 पी 5857 या क्रमांकाच्या ट्रकने मांगली गावाजवळ याच गावातील मुलीचा चिरडले. कीर्ती राजेंद्र पुंडे (वय 12), असे या मुलीचे नाव आहे. हा ट्रक तुमसर तालुक्यातील मांगली-देव्हाडीमार्गे निघाला होता. कीर्ती रस्त्यावरून सायकलने आपल्या घराकडे जात असताना वेगात असलेल्या ट्रकचा तिच्या सायकलला धक्का लागला. तिचा तोल जाऊन ती ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली. चाक डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

कीर्ती पाचवीत शिकत होती. घटनेनंतर चालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, गावकऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखवत ट्रकचा पाठलाग करून ट्रकला देवाडी रस्त्यावर रेल्वे गेटजवळ पकडले. नागरिकांनी चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. पंचनामा करून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात तुमसर पोलीस करत आहेत. मुलीच्या अपघातात झालेल्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.