ETV Bharat / headlines

Top 10 @ 11 PM : रात्री 11 वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

author img

By

Published : Aug 25, 2020, 5:05 PM IST

Updated : Aug 25, 2020, 10:52 PM IST

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, मनोरंजन, क्रीडा यांसह कोरोनासंबंधी क्षणाक्षणाची अपडेट वाचा, एका क्लिकवर...

top-10-news
Top 10 @ 11 PM : रात्री 11 वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

1) मुंबई- मुंबईची ओळख असलेल्या नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत म्हाडाच्या माध्यमातून हाती घेतला. पण आता मात्र सरकार आणि म्हाडाचा हा ड्रीम प्रोजेक्ट ठप्प होणार आहे. कारण नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासातील कंत्राटदार एल अँड टीने हा प्रकल्प गुंडळण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा- Exclusive: म्हाडाला L&T चा 'जोर का झटका'.. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून माघार

2)रायगड - महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे अनेक जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत 47 कुटुंबं राहत होती. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून बचावकार्य सुरू आहे.

सविस्तर वाचा- LIVE महाड इमारत दुर्घटना : ८ जणांचा मृत्यू; १८ तासांनंतर ४ वर्षीय मुलाला बाहेर काढण्यात यश

3)रायगड - नात, नातू धावत येऊन नाना म्हणून हाका मारीत धावत येतील, या आशेने आजोबांचे डोळे पडलेल्या तारिक गार्डन इमारतीच्या ढिगाऱ्याकडे लागले आहे. महंमद अली वुकेय यांची ही करुण कहाणी आहे. महंमद अली यांची मुलगी आणि दोन नाती, एक नातू हे तारिक गार्डन इमारती दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या दुर्घटनेतून चारही जण सुखरूप बाहेर पडावे, अशी भाबडी आशा महंमद अली यांनी धरली आहे.

सविस्तर वाचा- महाड इमारत दुर्घटना : ढिगाऱ्याखालून 'नाना' अशी हाक मारत माझे नातू धावत येतील, आजोबांची आशा

4) रायगड - 'देव तारी त्याला कोण मारी' अशी एक प्रचलित म्हण आहे. ही म्हण एका बालकाच्या रुपाने सत्यात उतरली आहे. महंमद बांगी (4) या चिमुकल्याला तब्बल 18 तासाच्या प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, आई नौशिन बांगी यांचा मृत्यू झाला असून दुसरी मोठी मुलगी आयशा ही अद्याप सापडलेली नाही. आजोबा महंमद अली हे आपले नातू आणि मुलगी जिवंत असू दे याबाबत प्रार्थना करीत होते. त्यांच्या या प्रार्थनेला ईश्वराने साद दिली आहे. सध्या महंमदवर महाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी मै अंधेरेमे अल्लाहसे पानी मांग रहा था, असे त्याने घरच्यांना सांगितले.

सविस्तर वाचा- मै अंधेरेमे अल्लाहसे पानी मांग रहा था, 18 तासानंतर सुखरुप वाचलेल्या महंमदची आपबीती

5) नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रीमंडळाच्या संसदीय व्यवहार समितीने संसदेचे मान्सून अधिवेशन 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरला घेण्याची शिफारस केली आहे. सूत्राच्या माहितीनुसार संसदेत एकूण 18 बैठक व्यवस्था असणार आहेत. त्यांच्या तारखा लवकरच घोषित करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या इतिहासात 1952 नंतर बैठक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा- संसदेचे मान्सून अधिवेशन 14 सप्टेंबरपासून होणार सुरू ? बैठक व्यवस्था बदलणार

6) बीड - गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील बाहेगव्हाण येथे मंगळवारी दुपारी घडली. लखन महादेव पोटभरे ( वय ११) व रोहन परमेश्वर मस्के (वय १०) अशी त्या मृत मुलांची नावे आहेत.

सविस्तर वाचा- विहिरीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू; बीडमधील घटना

7) मुंबई- जगभरात प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने मुंबईला आपले हॉटस्पॉट बनवले होते. ५ महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यास मुंबई महापालिकेला यश येत आहे. कोरोना रुग्ण दुपटीचा २४ दिवसांपूर्वी ७६ टक्के असलेला कालावधी आता ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर हा ७६ टक्क्यांवरून ८१ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

सविस्तर वाचा-दिलासादायक..! मुंबईत रुग्ण दुपट्टीचा कालावधी ८७ दिवसांवर, रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्के

8) रांची (झारखंड) - दुमका जिल्ह्यातील सगुनीबाद गावाजवळ एका चारचाकीवर ट्रक उलटल्याने कारमधील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील 2 पुरुष, 2 महिला व 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. क्रेनच्या सहाय्याने कारवरील ट्रक काढण्यात आला आहे.

सविस्तर वाचा- झारखंड : कारवर ट्रक उलटला, सहा जण जागीच ठार

9) नवी दिल्ली - विराट कोहली हा भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडू शकतो, असे भाकित माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केले आहे. विराट आपली क्षमता आणि तंदुरूस्तीच्या बळावर हे साध्य करू शकतो, असेही त्याने सांगितले.

सविस्तर वाचा- इरफान म्हणतो, 'हा' खेळाडू मोडू शकतो सचिनच्या शंभर शतकांचा विक्रम

10) मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरुण धवन कोविड लसची आतुरतेने वाट पाहत आहे. आपला मुद्दा सांगण्यासाठी वरुणने इंस्टाग्रामवर एक शर्टलेस स्नॅपशॉट पोस्ट केला आहे.

सविस्तर वाचा- "अब मुझे रात दिन, व्हॅक्सीन का इंतजार है", जाणून घ्या असे का म्हणाला वरुण धवन?

Last Updated : Aug 25, 2020, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.