मुंबई - राज्यातील प्रतिष्ठीत आणि मराठवाड्यातील प्रमुख असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडकडून प्राध्यापकांची भर्ती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भर्ती सालाबादप्रमाणे (2022)या वर्षी होत आहे. येथील विविध विभागात प्रकारच्या दहा प्राध्यापकांची ही भरती होणार आहे.
प्राध्यापक पदांच्या भरती संदर्भात तपशील पुढील प्रमाणे आहे पदाचे नाव आहे सहाय्यक प्राध्यापक, रिक्त पदांची संख्या दहा, अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन, आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोंबर 2022 अशी आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता असा - प्राचार्य पूज्य अहिल्यादेवी अध्यापक महाविद्यालय सांगवी तालुका, अहमदपूर जिल्हा लातूर
पिन कोड 413 515 असा आहे. यासंदर्भात संपर्क मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे- 976 38 30 323
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोंबर 2022 ही आहे. शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पदवी एम ए पदवी बी एड/ बी ई आय ईडी अशी आहे. नोकरीचे ठिकाण नांदेड