ETV Bharat / headlines

लाल महाल लावणी प्रकरण : नृत्यंगणेवर गुन्हा दाखल, मराठा महासंघाने केले शुद्धीकरण, शिवसेनेचे आंदोलन

पुण्यातील लाल महाल येथे एक महिन्यांपूर्वी सादर करण्यात आलेल्या लावणी प्रकरणी नृत्य ( Lal Mahal Lavani case ) करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलीस स्टेशन ( Faraskhana Police Station Pune ) येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला ( Crime against three including Vaishnavi Patil ) आहे. दरम्यान आज अखिल भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालात जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुग्धभिषेक करण्यात आला.त्यानंतर ज्या ठिकाणी शूट झाले. त्या ठिकाणाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण देखील करण्यात आले. लालमहाल परिसरात शिवसेनेचे आंदोलन सुरु आहे.

Lal Mahal lavni case
लाल महाल लावणी प्रकरण
author img

By

Published : May 21, 2022, 4:36 PM IST

Updated : May 21, 2022, 6:08 PM IST

पुणे - पुण्यातील लाल महाल येथे एक महिन्यांपूर्वी सादर करण्यात आलेल्या लावणी प्रकरणी नृत्य ( Lal Mahal Lavani case ) करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलीस स्टेशन ( Faraskhana Police Station Pune ) येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला ( Case Registered against Vaishnavi Patil ) आहे. दरम्यान आज अखिल भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालात जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुग्धभिषेक करण्यात आला.त्यानंतर ज्या ठिकाणी शूट झाले. त्या ठिकाणाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण देखील करण्यात आले. लालमहाल परिसरात शिवसेनेचे आंदोलन सुरु आहे.

लावणीचा व्हिडिओ व्हायरल - पुणे शहरातील ऐतिहासिक लाल महालात रील्स (छोटा व्हिडिओ) बनवणे एका प्रसिद्ध लावणी कलाकाराला महागात पडले. तिचा डान्स अश्लील असल्याचे सांगून शनिवारी नर्तिकेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डान्सरच्या वतीने माफी मागितली जात असली तरी लोकांचा राग शांत होत नाहीये. फरसाखाना पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, लावणी कलाकार वैष्णवी पाटील आणि व्हिडिओ शूटर कुलदीप बापट आणि त्यांच्या दोन साथीदारांवर लाल महालात अश्लील नृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी पाटील यांनी मंगळवारी हा व्हिडिओ शूट करून बुधवारी सोशल मीडियावर अपलोड केल्याचे तपासात समोर आले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या अकाऊंटवरून तो काढून टाकण्यात आला असला तरी तो अजूनही काही इतर अकाउंटवर व्हायरल होत आहे.

लाल महाल लावणी प्रकरण

चार जणांवर गुन्हा दाखल - पुण्यातील लाल महाल येथे वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे शूट केले होते. यानंतर ती रिल्स समाजमाध्यमांवर टाकण्यात आली होती. यानंतर सर्वत्र टिका होऊ लागली आणि आज पोलिसांनी तीन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील लालमहाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला असताना ही जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवले जात आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केला आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 295 (कोणत्याही धर्माच्या वर्गाचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळाचा अपमान) आणि 186 (लोकसेवकाला त्याच्या सार्वजनिक कार्यात स्वेच्छेने अडथळा आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेडची मागणी : पुण्यातील लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला असताना जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवले जात आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केल आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडने केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Lal Mahal lavni case
भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालाचे शुद्धीकरण

गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण - लाल महाल या ऐतिहासिक वास्तूमध्ये जिजाऊंच्या पुतळ्यासमोर वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी एका लावणीचे रिल्सचे शूट केले आहे. लावणीचा रिल्स सोशल मीडियावर येताच, राज्यातील शिवप्रेमीकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी आज अखिल भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालात जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुग्धभिषेक करण्यात आला. त्यानंतर ज्या ठिकाणी शूट झाले. त्या ठिकाणाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण देखील करण्यात आले.

शिवसेनेचे आंदोलन - लाल महाल परिसरात शिवसेनेने आंदोलन सुरू आहे. जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढणे हे चुकीचे आहे. याविरोधात शिवसेना लाल महाल परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे.

लाल महालाबद्दल माहिती - पुण्यातील लाल महाल हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध स्मारकांपैकी एक आहे. इसवी सन १६३० मध्ये छत्रपती शिवरायांचे वडील शहाजी भोसले यांनी आपल्या पत्नी जिजाबाई आणि मुलासाठी लाल महालाची स्थापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराज आपला पहिला किल्ला काबीज करेपर्यंत अनेक वर्षे येथे राहिलेले आहेत. मूळ लाल महाल अवशेष झाला आणि सध्याचा लाल महाल हा मूळचा पुनर्बांधणी केलेली आहे. आणि तो पुणे शहराच्या मध्यभागी आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, लाल महाल छत्रपती शिवाजी महाराज आणि शाइस्ते खान यांच्यातील चकमकीसाठी प्रसिद्ध आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालाच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची बोटे कापली होती.

हेही वाचा - Lal Mahal : लाल महालात तमाशाच्या गाण्यावर नाचणाऱ्यावर गुन्हा दाखल करा - संभाजी ब्रिगेड

Last Updated : May 21, 2022, 6:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.