ETV Bharat / headlines

केरळच्या पंबा धरणातील पाणी पातळीत वाढ ; ऑरेंज अलर्ट जारी - पथानमथिट्टा

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंबा धरणाची पाणी पातळी सध्या 983.05 ऐवढी आहे. येत्या एका तासात पाणी पातळीत 983.50 मीटरपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

केरळ
केरळ
author img

By

Published : Aug 9, 2020, 7:14 AM IST

तिरुवनंतपूरम - गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस पडल्याने सखल भाग पाण्याखाली बुडाले आहेत. केरळच्या पथानमथिट्टा जिल्ह्यात आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळ
केरळ

पंबा धरणाची पाणी पातळी सध्या 983.05 एवढी आहे. येत्या एका तासात पाणी पातळीत 983.50 मीटरपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. 984.5 मीटरपर्यंत पाणी पातळीत वाढ झाल्यावर रेड अलर्ट घोषित केला जाणार आहे. तसेच 985 मीटरपर्यंत पाणी भरल्यावर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, अलुवा येथील शिवमंदिराचा एक भाग पाण्याखाली गेला आहे. तथापि, पेरियार नदीतील पाण्याची पातळी हळूहळू कमी होत आहे आणि मंदिराचा अधिक भाग आता पाणी पातळीच्यावर गेला आहे.

शुक्रवारी कोझिकोड जिल्ह्यात भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) रेड अलर्ट जारी केला होता. तसेच राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज वर्तविला होता. मुसळधार पावसामुळे नुकतीच इडुक्की जिल्ह्यात भूस्खलन झाले होते. भूस्खलनात मृतांचा आकडा 26 झाला असून राज्यात मान्सून अजूनही तीव्र असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.