ETV Bharat / entertainment

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये शैलेश लोढाच्या जागी सचिन श्रॉफ? - Shailesh Lodha in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

तारक मेहता का उल्टा चष्मा शोमधून अभिनेता शैलेश लोढा बाहेर पडल्यानंतर नव्या तारक मेहताचा शोध सुरू होता. आता निर्मात्यांनी नवा प्रोमो जारी केला असून यात तारक मेहताची व्यक्तीरेखा दिसत आहे. यात अभिनेत्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. परंतु हा सचिन श्रॉफ असल्याचा तर्क प्रेक्षक लावत आहेत.

Etv Bharat
तारक मेहता का उल्टा चष्मा
author img

By

Published : Sep 13, 2022, 3:28 PM IST

मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय शोमधून तारक मेहताची भूमिका करणारा अभिनेता शैलेश लोढा बाहेर पडल्यानंतर नव्या तारक मेहताचा शोध सुरू होता. आता निर्मात्यांनी नवा प्रोमो जारी केला असून यात तारक मेहताची व्यक्तीरेखा दिसत आहे. ही भूमिका कोण साकारणार ही उत्कंठा असताना हा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यात अभिनेत्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. परंतु हा सचिन श्रॉफ असल्याचा तर्क प्रेक्षक लावत आहेत.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या शोच्या नवीन प्रोमोमध्ये अंजली मेहता (तारकची पत्नी) सोसायटीच्या पंडालमध्ये गणेशाची आरती गाताना एका माणसाचा आवाज ऐकू येत असल्याचे दाखवले आहे. व्हिडिओचे कॅप्शन असे लिहिले आहे की, "आखिर कौन कर रहा है गणपती बाप्पा की आरती जानने के लिए देखते रहे.'' आपल्याला त्या माणसाचे हात आणि डोळे बघायला मिळतात पण त्याचा चेहरा नाही. चाहत्यांनी अंदाज लावला आणि दावा केला की सचिन श्रॉफच शैलेशच्या भूमिकेत आहे आणि शोमध्ये तारक मेहताची भूमिका करेल.

त्यांच्यापैकी काहींनी शैलेशची जागा घेण्याच्या या निर्णयाचे कौतुक केले तर काहींना ही कल्पना आवडली नाही. त्यांच्यापैकी एकाने लिहिले की, "ग्रेट नवा तारक मेहता ग्रेट शो बंद नही होना चाहिये धीरे धीरे समायोजित करेंगे इनको भी.''

आणखी एकाने कमेंट केली, "हा शो भारतात आतापर्यंतचा सर्वोत्तम शो आहे, कृपया नवीन कलाकारांना घेऊन तो खराब करू नका. जुने कलाकार आणि जुने TMKOC सर्वोत्तम आणि शुद्ध मनोरंजन होते."

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सचिन शैलेशची जागा तारक मेहताच्या भूमिकेत घेणार असल्याचा दावा या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या बातम्यांमध्ये करण्यात आला होता. सचिनच्या अलीकडच्या प्रोजेक्ट्समध्ये प्रकाश झा यांचा वेब शो आश्रममध्ये दिसला होता. त्यानंतर तो टीव्ही शो 'घुम है किसी के प्यार में' मध्येही दिसला होता.

हेही वाचा - बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रची परीक्षा, चौथ्या दिवसाखेर २५० कोटीकडे वाटचाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.