ETV Bharat / entertainment

लग्नानंतर पहिला डान्स करताना नुपूरने घेतले आयरा खानच्या कपाळाचे चुंबन - आयराच्या कपाळाचे चुंबन

Nupur Shikhare kisses Ira Khan : आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नपूर शिखरेचा विवाह 10 जानेवारी 2024 रोजी उदयपूर येथे पार पडला. ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या या लग्नाच्या व्हिडिओंमध्ये, नुपूर शिखरे आयराच्या कपाळाचे एक प्रेमळ चुंबन घेताना दिसत आहे.

Nupur Shikhare kisses Ira Khan
आयरा आणि नुपूरचा विवाह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 9:41 AM IST

मुंबई - Nupur Shikhare kisses Ira Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान हिने 10 जानेवारी 2024 रोजी उदयपूर येथील ताज अरावली रिसॉर्टमध्ये एक स्वप्नमय समारंभात लग्न केलं. आयरा आणि नुपूर शिखरेचा लग्नसोहळा ख्रिश्चन पद्धतीने पार पडला. लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. यामध्ये नुपूर आयराच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसतो.

एकत्र नाचणार्‍या नवविवाहित जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गाण्याच्या तालावर आकर्षक स्टेप्स करताना दोघेही खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहेत. आयरा खान पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये परीसारखी दिसत आहे. तिने एक पांढरा फुलांचा हेअरबँड माळला होता आणि तिने केस छान बनवले होते. दुसरीकडे नुपूर शिखरेनं नीटनेटका पोशाख परिधान करुन सुंदर दिसत होता.

दुसर्‍या व्हिडिओमध्ये, आयरा एक पुष्पगुच्छ घेऊन जाताना आणि नूपूरसोबत चालताना दिसत आहे. लग्नाला उपस्थित पाहुण्यांनी फुलांच्या पाकळ्यांची उधळण त्यांच्यावर केली. दुसर्‍या एका व्हिडिओमधील नवविवाहित जोडपे आमिर खान, रीना दत्ता आणि कुटुंबातील इतर सदस्यांसमवेत स्टेजवर दिसत आहे. आयरा आणि नुपूरने इम्रान खान आणि त्याची मैत्रीण लेखा वॉशिंग्टन यांच्यासमवेत दिसत असल्याचा एक फोटो पाहुण्यांपैकी एकाने पोस्ट केला आहे.

7 जानेवारी रोजी, उदयपूरमध्ये आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या उत्सवाची सुरूवात झाली. दुसर्‍या दिवशी पायजामा पार्टी आणि मेहंदी सोहळा पार पडला. 9 जानेवारी रोजी संध्याकाळी झालेल्या संगीत समारंभानंतर या जोडीने बुधवारी एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार केला आणि शपथेची देवाणघेवाण केली.

आयरा आणि नुपूरचे यापुढे मुंबईत एक ग्रँड रिसेप्शन पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान, जुही चावला, अजय देवगण, अमिताभ बच्चन, करण जोहर, राजकुमार हिरानी, आशुतोश गोवरीकर आणि करीना कपूर यांच्यासह आमिर खानचे अनेक जवळचे मित्र आणि सहकारी यांचाही समावेश असेल.

हेही वाचा -

  1. महात्मा फुलेंच्या जीवनावरील 'सत्यशोधक' चित्रपट झाला करमुक्त
  2. कतरिना कैफ विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस'मधील पहिलं गाणं प्रदर्शित
  3. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपटाचं शीर्षक ठरलं, पोस्टर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.