ETV Bharat / entertainment

Mi Honar Superstar Chhote Ustad 2 : मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उचललीय वैदेही परशुरामीने!

टीव्ही शो आणि चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री वैदेही परशुरामी आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २' शो सुरू होत असून याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी वैदेही परशुरामी पार पाडणार आहे.

Etv Bharat
वैदेही परशुरामी
author img

By

Published : May 30, 2023, 8:04 PM IST

मुंबई - बऱ्याचदा चित्रपट कलाकारांमध्ये अभिनयाव्यतिरिक्त इतरही गुण असतात. कुणी कविता करतं, कुणी चित्रं रेखाटतं, कुणी लिहितं, कुणी सुरेल गातं तर कुणी उत्तम वक्ता असतं. आजच्या घडीला अनेक सिनेकलाकार एकापेक्षा जास्त गोष्टींमध्ये रमताना दिसतात. अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद अथवा आवडीनिवडी ते इमानेइतबारे जोपासताना दिसतात. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वावरणारी सुंदर अभिनेत्री वैदेही परशुरामी देखील सूत्रसंचालनात आपले कसब दाखविताना दिसते. गेल्या वर्षी तिने पहिल्यांदाच छोट्या पडद्यावरील 'फू बाई फू' (सिझन ९) मध्ये कॉमपियरींग केले होते आणि ते सर्वांना आवडले होते. तिची बोलण्याची अदा आणि स्पर्धकांना आपलेसे करण्याचे कसब यामुळे ती 'फू बाई फू' च्या सेटवर सर्वात पॉप्युलर सेलिब्रिटी होती. अर्थात वैदेही ने कुठलेही नखरे दाखविले नाही आणि विनासायास शूटिंग पार पाडायची. आता 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' च्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करण्यासाठी वैदेही परशुरामीची वर्णी लागली आहे.

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ च्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या म्युझिकल कार्यक्रमाचे दुसरे पर्व येत आहे. आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन येत असून ते प्रेक्षकांना आपल्या जादुई आवाजाने बेधुंद करतील अशी ग्वाही निर्मात्यांनी दिली आहे. लहानग्यांच्या सुरांची मैफल आणि लाघवी आणि मधाळ बोलणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी हिचे सूत्रसंचालन कार्यक्रमाची शोभा द्विगुणित करणार असेही निर्मात्यांनी म्हटले आहे.

वैदेही परशुरामी व्यक्त होत म्हणाली की, 'सूत्रसंचालन वाटते तितके सोप्पे काम नाहीये. तुम्हाला सतत जागरूक राहावे लागते आणि प्रसंगानुरूप बोलावे लागते. स्क्रिप्ट जरी असले तरी.बऱ्याचदा उस्फूर्तपणे बोलावे लागते. तसेच स्पर्धक आणि जजेस यांना बोलते करणं हेही महत्त्वाचे असते. सूत्रसंचालनाच्या अनुभवाविषयी सांगायचं की मी माझी भूमिका छानपणे निभवते. खरंतर गेल्या वर्षी मी माझ्या एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने छोटे उस्ताद च्या पहिल्या पर्वात आले होते. यातील स्पर्धकांची प्रतिभा मला खूप भावली. या लहान उस्तादांचे प्रेझेंटेशन अप्रतिम होते. मनातून वाटत होतं की आपणही या टॅलेंट च्या सहवासात राहावं. कदाचित देवाने माझे मन ओळखले असावे म्हणूनच 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' च्या निर्मात्यांनी मला दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करण्यासाठी आमंत्रित केले. मी हे नक्की सांगू शकेन की इथे अवाक करणारं टॅलेंट आहे.'

वैदेही पुढे म्हणाली की, 'मी स्टार प्रवाहची ऋणी आहे कारण त्यांनी मला प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा होस्ट करण्याची संधी दिली. त्यांनी माझ्यात ही कला आहे हे ओळखले त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. लहान मुलांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थोडे अवघड असते. मुलं कधी कुठल्या पद्धतीने रिॲक्ट होतील याचा भरवसा नसतो त्यामुळे हजरजबाबीपणा अंगी असावा लागतो. मला हे सोप्पे जाते करणला लहान मुलं खूप आवडतात. खरंतर त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही असतं. मी या पर्वात निरनिराळ्या फॅशन आणि केशरचना करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनवे लूक्स करण्याची मला संधी मिळणार आहे याचा मला आनंद आहे.'

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व दुसरे येत्या १० जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा - Zara Hatke Zara Bachke : पती विकीसोबत कॅटरिनाला का कास्ट केले नाही? जरा हटके जरा बचके दिग्दर्शकाने केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.