ETV Bharat / entertainment

'आमच्यावरील बलात्कार थांबवा': अर्धनग्न महिलेचे कान्स रेड कार्पेटवर आंदोलन - Ukraine sexual abuse

कान्सच्या रेड कार्पेटवर एक महिला अर्धनग्न होऊन निदर्शने करताना आढळून आली. युक्रेनमध्ये आमच्यावरील बलात्कार थांबवा असा संदेश तिने आपल्या छातीवर आणि पोटावर लिहिला होता.

कान्स रेड कार्पेटवर आंदोलन
कान्स रेड कार्पेटवर आंदोलन
author img

By

Published : May 21, 2022, 12:19 PM IST

कान्स ( फ्रान्स ) - ७५ व्या कान्स फिल्म महोत्सवाच्या रेड कार्पेटवर एक अजब दृष्य पाहायला मिळाले. एक अर्धनग्न महिला रेड कार्पेटवर अवतरली आणि तिने युक्रेनमध्ये होत असलेल्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराला विरोध करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. अखेर त्या आंदोलनकर्त्या अर्धनग्न महिलेला कान्सच्या रेड कार्पेटवरून हटवावे लागले.

हॉलिवूड रिपोर्टरने वृत्त दिले की, रेड कार्पेटवर एक महिला आली व तिने फोटोग्राफर्सचे लक्ष आपल्याकडे वेधत गुडघ्यावर बसून आपले कपडे उतरवायला सुरूवात केली. लगेचच सुरक्षा रक्षक तिच्याकडे धावत आले आणि कोटने तिला झाकताना दिसले.

तिने तिच्या शरीरावर युक्रेनच्या ध्वजाच्या रंगात पेंट लावले होते आणि तिच्या छातीवर आणि पोटावर 'आमच्यावरील बलात्कार थांबवा' असे शब्द लिहिले होते. या महिलेच्या पाठीवर आणि पायावर रक्ताचा लाल रंग होता व तिच्या पाठीवर 'SCUM' असा शब्द लिहिला होता.

हेही वाचा - मीरा चोप्राचे गोल्डन आउटफिटमध्ये कान्समध्ये पदार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.