मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘भोंगा’ खूप मोठ्या प्रमाणात वाजत आहे. मशिदींवरील ‘भोंगा’ उतरविण्यासाठी काही विरोधी पक्षाचे नेते राज्यसरकारला वेठीस धरत आहे. भोंगा हवा की नको यावर जनमानसात परस्परविरुद्ध चर्चा घडत असताना काही कलाकारांनीसुद्धा त्याबाबतीत आपले मत मांडले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून अफलातून नृत्य पेश केलेली सुंदर अभिनेत्री प्राजक्ता माळी हीसुद्धा या विषयवार व्यक्त झाली. तिने केलेली पोस्ट प्रचंड ट्रेंड झाली आणि सर्वत्र चर्चा घडू लागली.
प्राजक्ता माळीची सोशल मीडियावर सूचक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट - मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पारंपारिक पेहरावात समाज माध्यमावर भोंग्याबाबत वर्तमानपत्रात आलेल्या एका लेखाचा फोटो शेअर केला आहे. या लेखात मशिंदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत असे म्हटले आहे. ती म्हणाली की, “सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयाच्या आणि मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. असं तिने पोस्टमध्ये लिहीलं आहे. पुढे तिने भोंग्यांबाबत वक्तव्य केलं की, असो…, आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल असी अपेक्षा बाळगते. #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक धन्यवाद..”प्राजक्ता माळीची सोशल मीडियावर सूचक पोस्ट राज ठाकरेंना धन्यवाद - महाराष्ट्राच्या राजकारणात ‘भोंगा’ हा विषय कळीचा मुद्दा बनला असून राज्यकर्ते आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होताना दिसतेय. नुकत्याच औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यांबाबत जी आक्रमक भूमिका घेतली आणि आणि ते उतरविण्यासाठी ४ मे पर्यंत राज्यसरकारला अल्टीमेटम दिला आहे. यावर मराठी अभिनेत्री-अभिनेते यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील प्राजक्ता माळीनं एक वक्तव्य केलं आहे जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिने मा. राज ठाकरे यांच्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत हे पोस्ट करीत, “मा श्री राज ठाकरे सगळ्याचसाठी..परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूंच्या-महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचे तुमचं भाषण ऐकून ऊर अभिमानाने भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं? खुप खुप धन्यवाद”.