ETV Bharat / entertainment

New marathi serial : दोन पिढ्यांमधील वैचारिक तफावत मांडणारी मालिका ‘भाग्य दिले तू मला’ - अभिनेत्री निवेदिता सराफ

लवकरच कलर्स मराठीवर ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका ( New marathi serial ) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत विवेक सांगळे, तन्वी मुंडले, जान्हवी किल्लेकर महत्वपूर्ण भूमिकेत असणार आहेत.

New marathi seria
author img

By

Published : Apr 5, 2022, 12:13 PM IST

मुंबई : तरुण पिढीला नाविन्याची कितीही ओढ लागली तरी मुळाशी, परंपरेशी जोडून राहिलेली माणसंचं आपली स्वप्न पूर्ण करू शकतात. आधुनिक पोकळ झगमगाटापेक्षा सुसंस्कृत दीपोत्सवच प्रगल्भ असतो. संस्कृतीला आणि परंपरेला धरून रहाणार्‍या व्यक्तीला वेडं ठरवणार्‍या या जगात जेव्हा एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन जेव्हा एकमकांना समोर येतात तेव्हा काय घडते हे नवीन मालिका ‘भाग्य दिले तू मला’ मधून उलगडेल. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिकेमध्ये मध्यवर्ती व्यक्तीरेखा साकारणार असून त्यांच्यासोबत विवेक सांगळे, तन्वी मुंडले, जान्हवी किल्लेकर महत्वपूर्ण भूमिकेत असणार आहेत.

गुहागर येथे लहानाची मोठी झालेली कावेरी भाग्यशाली असं म्हणायला हरकत नाही कारण सावत्र आईचा दुस्वास तिला कधीच सहन करावा लागला नाही. मुळातच सांस्कृतिक चालीरीती, निसर्ग, भाषा आणि आपली माणसं यांच्यावर जिवापाड प्रेम करणार्‍या आणि त्यांना अविभाज्य भाग मानणार्‍या कावेरीचे मन कधीच सिमेंट काँक्रीटच्या घरात रमलं नाही. तर, दुसरीकडे, परंपरा आणि संस्कृती यांना जळमटासारखं झटकून पुढे चालणारा, आताच्या भौतिक सुखांपुढे नाती, प्रेम यांना तुच्छ लेखणारा उद्दाम, मग्रूर, आणि मुळांशी न जोडलेला राजवर्धन म्हणजेच रत्नमाला यांचा मुलगा.

काय आहे कथा?
परंपरेची कास कधीच न सोडलेल्या, त्याचा अभिमान असलेल्या रत्नमाला खूप मोठे प्रस्थ आहे. त्या मोठ्या उद्योजिका आहेतच परंतु त्यांना त्यांच्या उद्योगाचा डोलारा यशस्वीरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी, राजवर्धनमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्यासारख्याच संस्कृतीला धरून चालणार्‍या सुनेची गरज आहे. याचदरम्यान त्यांची आणि कावेरीची भेट होते. आता, रत्नमाला यांच्या पुढाकाराने कसे राजवर्धन आणि कावेरी एकेमकांना कसे भेटणार आणि त्यांचा प्रवास कसा असेल हे या मालिकेतून समजेल. तसेच कावेरी आणि राजवर्धनची हळुवार प्रेमाची गोड गोष्ट रंगणार की नाही आणि रंगली तर कशी रंगणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.
हेही वाचा - Godavari in NYIFF : न्यूयॅार्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोदावरी’ची झाली निवड!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.