मुंबई - अमेझॉन स्टु़डिओज आणि न्यू यॉर्क टाईम्सची सह-निर्मिती असलेली 'मॉडर्न लव्ह' या काव्यमय मालिकेचे भारतीय रुपांतर पाहायला मिळणार आहे. याचे शीर्षक 'मॉडर्न लव्ह मुंबई' असे असेल. याचा टीझर बुधवारी रिलीज करण्यात आला आहे. केवळ नावे असलेल्या या अॅनिमेशन व्हिडिओमध्ये या मालिकेत काम करीत असलेल्या कलाकारांची यादी पाहायला मिळते. मुंबईतील प्रेमाचा हा काव्यमय आध्याय अनेक पैलू उलगडून दाखवणार आहे.
यात प्रेमाच्या अनेक कथा पाहायला मिळतील आणि त्या सादर करण्यासाठी दिग्गज कलाकारांनी कंबर कसली आहे. विशाल भारद्वाज, हंसल मेहता, शोनाली बोस, ध्रुव सहगल, अलंकृता श्रीवास्तव आणि नुपूर अस्थाना यांची नावे या प्रोजेक्टशी जोडली गेली आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या मालिकेत ज्या काव्यमय कथा समाविष्ट आहेत त्या पुढील प्रमाणे:
'रात राणी' - शोनाली बोस दिग्दर्शित, फातिमा सना शेख, भूपेंद्र जदावत आणि दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिका
'बाई' - हंसल मेहता दिग्दर्शित, तनुजा, प्रतीक गांधी आणि रणवीर ब्रार यांच्या प्रमुख भूमिका
'मुंबई ड्रॅगन' - विशाल भारद्वाज दिग्दर्शित, येओ यान यान, मीयांग चांग, वामिका गब्बी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या प्रमुख भूमिका
'माय ब्युटीफुल रिंकल्स' - अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित, सारिका, दानेश रझवी, अहसास चन्ना आणि तन्वी आझमी यांच्या प्रमुख भूमिका
'आय लव्ह ठाणे' - ध्रुव सेहगल दिग्दर्शित, मसाबा गुप्ता, ऋत्विक भौमिक, प्रतीक बब्बर, आधार मलिक आणि डॉली सिंग यांच्या प्रमुख भूमिका
'कटिंग चाय' - नुपूर अस्थाना दिग्दर्शित, चित्रांगदा सिंग आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका
प्रितिश नंदी कम्युनिकेशन्स निर्मित, 'मॉडर्न लव्ह मुंबई' 13 मे पासून स्ट्रीमसाठी उपलब्ध असेल.