मराठी बिग बॉसची स्पर्धक मेघा घाडगे आता एका लावणीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सप्तसूर म्युझिकचा नवा म्युझिक अल्बम ,'अहो पाव्हनं ...' मधून अस्सल लावणीचा आनंद संगीतप्रेमींना घेता येणार आहे. बऱ्याच काळानंतर अभिनेत्री मेघा घाडगे लावणी करताना दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता संजय खापरेही या म्युझिक व्हिडिओमध्ये आहे.
असंख्य प्रसिद्ध कोळी गीतं, लग्नगीतं दिल्यानंतर सप्तसूर म्युझिकने"अहो पाव्हनं ...ही लावणी आणली आहे. साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. तर मेघा घाडगे आणि संजय खापरे या म्युझिक व्हिडिओत प्रमुख भूमिकेत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अहो पाव्हनं ... या गाण्याचं लेखन योगेश पाटील यांनी केलं आहे, तर प्रवीण डोणे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे यांनी गायलं आहे. मेघा घाडगे यांनी या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केले असून नृत्यदिग्दर्शक म्हणून अविनाश पायाळ यांनी काम पाहिले आहे. सुरेश देशमाने यांनी छायाचित्रण केले असून जयेंद्र भांडे या गाण्याचे संगीत संयोजक आहेत.अंकित शिंदे आणि दिव्या घाग यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. "अहो पाव्हनं ..." ही अस्सल लावणी रसिकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मेघा घाडगे अलिकडे बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून गेली होती. यात तिची मैत्री अपूर्वा नेमळेकरशी झाली होती. आता बगिस बॉसची उपविजेती झालेल्या अपूर्वा आणि मेघा यांनी एकत्र वेळ घालवला. तर मुंबईच्या मरिन ड्राइव्हवर दोघींना निवांत क्षण अनुभवले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अपूर्वा आणि मेघाची ही मैत्री ‘बिग बॉस’च्या घरातही प्रेक्षकांनी पाहिली होती. आता बिग बॉसच्या घराबाहेरही त्यांची मैत्री टिकून आहे.
अपूर्वाला भेटल्यानंतर मेघानं एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत अपूर्वा आणि मेघा वेडच्या गाण्यावर सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहेत. या व्हिडिओ पाहून काही जणांनी त्यांना ट्रोलही केलं आहे. सध्या वेड चित्रपटानं प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलं आहे. या चित्रपटातील गाणी देखील गाजत आहे. या गाण्याच्या सिग्नेचर स्टेपनंही नेटकऱ्यांना वेड लावलंय. प्रत्येक जण या स्टेपवर नाचताना दिसतोय. अपूर्वा आणि मेघा यांनी देखील या गाण्याची सिग्नेचर स्टेप करत व्हिडिओ शेअर केला. पण व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांनी मेघाला ट्रोल केलं. ट्रोल केल्यानंतर मेघानं देखील ट्रोलरला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.