ETV Bharat / entertainment

अर्जुन कपूरनं अनन्या पांडेसोबतच्या 'आशिकी'चे संकेत दिल्यावर पाहा आदित्य रॉय कपूरची प्रतिक्रिया - आदित्य रॉय कपूर

Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण' सीझन 8 च्या आगामी एपिसोडमध्ये करण जोहर आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूरसोबत गप्पा मारताना दिसणार आहे. वैयक्तिक बाबींवर आदित्य सहसा मौन बाळगून असतो, पण अनन्याच्या बाबतीत अर्जुन कपूरनं बोलणं सुरू केल्यावर त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

Koffee With Karan 8
'कॉफी विथ करण' सीझन 8
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 1:20 PM IST

मुंबई - Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण' सीझन 8 च्या आगामी एपिसोडमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर शोच्या सोफ्यावर बसलेले दिसणार आहेत. या दोघांना बोलतं करताना झालेल्या चर्चेकडे तमाम चाहते लक्ष ठेवून आहेत.

सारा अली खान सोबत जेव्हा अनन्या पांडे आली होती तेव्हा तिचा उल्लेख सारानं "अनन्या कोय कपूर" असा खेळकरपणे केला होता. अनन्या आणि आदित्य रॉय कपूरच्या नात्यासंबंधातलं हे विधान होतं. या शोमध्ये आदित्यनं मात्र खूप सावधगिरी बाळगत आणि करणच्या खासगी चौकशीला बगल देण्याचा प्रयत्न केला. करणनं जेव्हा त्याला अनन्याशी डेटिंग करण्याबद्दलचा प्रश्न विचारला तेव्हा आदित्यने करणलाच एक डोस पाजला. या प्रश्नाला उत्तर देताना तो चतुराईनं म्हणाला, "मला कोणतंही गुपिते विचारू नका, आणि मी तुम्हाला काही खोटे सांगणार नाही."

आदित्यच्या सावधगिरीला न जुमानता, करणने एक काल्पनिक परिस्थिती मांडली आणि अर्जुनला विचारले की, "अनन्या आणि श्रद्धा कपूर सोबत जर लिफ्टमध्ये अडकला तर तो काय करेल?" यावर तो म्हणाला, "आशिकी तो जरूर करता अब किसके साथ वो नहीं पता," या अर्जुनच्या मिष्कील उत्तराने आदित्यची आश्चर्यचकित प्रतिक्रिया उमटली, त्यानंतर अर्जुनने हे सगळे मस्करीत बोललो असेही सांगितले.

मुलांसोबत राहण्यासाठी कित्येक रोमँटिक संध्याकाळी टाळल्या असल्याचं दोघांनीही सांगितलं. अफांबद्दल बोलताना अर्जुन कपूर म्हणाला की, "माझ्याबद्दल आधीपासून पुरेशा अफवा आहेत; त्यापैकी काही प्रत्यक्षात मी संपवतो."

अर्जुन कपूर आणि आदित्य रॉय कपूरचा 'कॉफी विथ करण'चा एपिसोड डिस्ने+ हॉटस्टारवर १४ डिसेंबरपासून सकाळी १२ वाजता स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. या लोकप्रिय चॅट शोच्या नव्या पर्वाची सुरुवात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यासोबत झाली, त्यानंतर सनी देओल आणि बॉबी देओल यांनीही हजेरी लावली होती. सारा अली खान आणि अनन्या पांडे यांनी चालू हंगामात धमाल केली होती, तर आलिया भट्ट आणि करीना कपूर खान अनेक रहस्ये उघड केली. मागील एपिसोडमध्ये वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा झळकले होते, तर विकी कौशल आणि कियारा अडवाणी यांनीही मागील एपिसोडमध्ये गंमत आणली होती.

हेही वाचा -

  1. अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर 'खो गए हम कहाँ'चं ट्रेलर रिलीज
  2. सलमान खाननं वाचवलं होतं अनुष्का-विराटचं नातं ; जाणून घ्या या मागची कहाणी
  3. सबा आझादचा 'आय वान्ना सी यू डान्स'वर परफॉर्मन्स, हृतिक रोशननं केलं कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.