मुंबई - पर्यावरणाचा ऱ्हास ही जागतिक समस्या आहे. जर का पर्यावरणाची आतापासूनच काळजी घेतली गेली नाही तर पुढील पिढ्यांना अतोनात हात सोसावे लागतील. जगातील प्रत्येक मनुष्याने हा विषयाकडे गांभीर्याने बघायला हवं. आपल्या देशातही पर्यावरण वाचविण्यासाठी अनेकजण आपापला हातभार लावताना दिसतात. फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील जीजी अक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे यांच्या पुढाकाराने सेटवरच्या प्लास्टिक बाटल्यांचा टाकाऊ पासून टिकाऊ वापर केला जातोय आणि त्यांचे सेटवर कौतुकही होतेय.
निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलंय. त्याचं हे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आता आपण सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कलाकारांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतलाय. जीजी अक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे यांच्या पुढाकाराने सेटवरच्या प्लास्टिक बाटल्यांचा टाकाऊ पासून टिकाऊ वापर करण्यात येत आहे. सेटवर पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या एकत्र जमा केल्या जातात. अदिती ताई या रिकामी बाटल्या दादर मधील ग्रीन इनिशिएटीव्ह या संस्थेला देतात. प्लास्टिकच्या या निरुपयोगी बाटल्यांपासून इंधन निर्मिती केली जाते किंवा बागेत सुशोभीकरणासाठी वापरल्या जातात.
गेले वर्षभर अदितीताई हा उपक्रम सेटवर राबवत आहेत. अदिती ताईंच्या या उपक्रमाला फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील सर्वच कलाकार सहाय्य करत असून पर्यावरण रक्षणासाठी झटत आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेच्या सेटवरचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
हेही वाचा - मिस युनिव्हर्स हरनाज संधूविरोधात उपासना सिंगने ठोकला न्यायालयात दावा