शिर्डी ( अहमदनगर ) - महाराष्ट्राचा विनोदवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाऊ कदमनं शिर्डी साईबाबा समाधीचे दर्शन घेतलं. पत्नी ममता सोबत गुरुवारी साईदर्शन त्यानं घेतलं. साईदर्शनानंतर भाऊ कदमने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला, ''साईबाबा जेव्हा बोलवतात तेव्हा शिर्डीला यावं लागतं. बाबाचं दर्शन आणि त्यात गुरुवार असल्यानं शिर्डीत आल्याच भाग्य आहे. कालच इव्हेंट असल्यानं आज सुटीचा दिवस होता. आपण उशिरा झोपल्यानं उशिरा उठलो मात्र पत्नीला बाबांच्या काकड आरतीसाठी पोहोचता आल्याचं समाधान आहे. साईबाबांचा आपल्यावर आशीर्वाद आहे, साईभक्त चला हवा येऊद्या टीमवर खूप प्रेम करतात'', असेही तो म्हणाला.
चला हवा येऊ द्यामध्ये केजीएफचा रॉकी भाई - चला हवा येऊ द्या या शोच्या अलिकडच्या भागात भाऊ कदमने केजीएफचा रॉकी भाई साकारला होता. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, ''आमच्या आमच्यात रॉकी बनलो तसं रॉकी बनायला जमलं नसतं. कारण केजीएफ-2 KGF-2 चित्रपट खूप हिट झाला. एवढ्या मोठ्या पात्राची भूमिका करायला मिळाली हा आनंद वेगळाच आहे. यादरम्यान खूप धमाल केली. तसं काम करायला आणि रॉकी बनायला मिळाल नसतं तेव्हा आमच्या आमच्यात रॉकी बनलो. प्रेक्षकांनी ही भूमिका खूप पसंत केली आणि चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत. ''
भाऊच्या पाठांतराचा प्रॉब्लेम आहे का? - असं विचारले असता भाऊ म्हणाला, ''पाठातंरची मस्करी पंचसाठी असते. तसं पाठांतर होत नाही, कारण पाठांतर करायचे म्हणटलं तर खूप वेळ लागला असता. मजा म्हणून आम्ही हे सर्व घेतो. लोकांना ही आता वाटायला लागल की खरचं माझा पाठांतर कमी आहे. त्याचा फायदा मला होतो. कारण मला कमी वाक्य येतात. ही सर्व साईबाबांची कृपा आहे. सोमवार मंगळवार चाहत्यांना मी घरातलाच वाटतो. सर्व टिमला घरातल्या सदस्या प्रमाणे प्रेक्षक आमच्यावर प्रेम करतात. चाहते तर अगदी खांद्यावर हात टाकून बोलतात, असं प्रेम प्रत्येक कलाकारा मिळत नाही.''
साईबाबांच्या दर्शनासाठी भाऊ काकड आरतीला हजर राहू शकला नव्हता. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, ''मला सकाळी उठण्यास उशीर झाला म्हणुन मी पहाटेची आरतीला येऊ शकलो नाही. मात्र तिची काकड आरती झाली. दुस-याच्या पत्नीला घरात परवानगी नाही. तेव्हा माझ्याच पत्नीला घेवून आलोय. ती खूश म्हटल्यावर माझं ही वर्ष चांगले जाईल.'', असे तो मिश्किलपणे म्हणाला.
भाऊ कदमं रंगभूमीवर अगदी साधा वाटतो, मात्र सर्वसामान्य जीवनात भाऊ मितभाषी आहे. एकदा रंगभूमीवर पाय ठेवला की ते पात्र स्वतःत आणावाच लागतं त्यामुळे लोकांना ते पसंत पडतं. जीवनात संधी मिळाली तर मी ज्या व्यक्तीमत्वासाठी योग्य असेल ते पात्र साकरताना खूप आनंद होईल असं देखील भाऊनं यावेळी अवर्जून सांगीतलं. चला हवा येऊद्या मध्ये भोंगा कधी वाजेल यावर विचारले असता सध्या राज्यात भोंगा वाजत आहे आणि तो कायम वाजतच राहणार हे देखील आपल्या विनोदी शैलीत भाऊनं मांडलं.
हेही वाचा - न्यूयॉर्कमधील प्रियंका चोप्राच्या सोना रेस्टॉरंटला कॅटरिना विकीने दिली भेट