ETV Bharat / entertainment

पाहा, प्रेमगीताचा नवा म्युझिक व्हिडिओ ‘हळुवार पाऊले’! - हळुवार पाऊले म्यूझिक व्हिडिओ

पाहा, प्रेमगीताचा नवा म्युझिक व्हिडिओ ‘हळुवार पाऊले’!

हळुवार पाऊले म्यूझिक व्हिडिओ
हळुवार पाऊले म्यूझिक व्हिडिओ
author img

By

Published : May 13, 2022, 5:12 PM IST

मुंबई - हल्लीचे प्रेक्षक थोडे जास्त संगीतप्रेमी झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत संगीतक्षेत्रात म्युझिक सिंगल्सना खूप डिमांड आला आहे. तसेच या सिंगल्स मुळे अनेक नवीन टॅलन्टसना लोकांसमोर येण्यास वाव मिळतोय. नव्या दमाच्या कलावंतांना संधी देणाऱ्या सप्तसूर म्युझिकने ‘हळुवार पाऊले’ हा म्युझिक व्हिडिओ प्रस्तुत केला आहे. अभिनेत्री आणि ऍडव्होकेट असलेल्या अनुजा चौधरीसह, सॉफ्टवेअर कंपनी मध्ये कार्यरत असलेला हरीश वांगीकर म्युझिक व्हिडिओमध्ये चमकला आहे. हरीशनं आतापर्यंत गायक, संगीतकार, अभिनेता म्हणून या पूर्वी काही म्युझिक व्हिडिओ केले आहेत, तर अनुजानं "असेही एकदा व्हावे" हा चित्रपट, शौर्य, कुसुम अशा काही मालिका केल्या आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हरीश वांगीकरनं या म्युझिक व्हिडिओच्या निर्मितीसह संगीत आणि गायनाची जबाबदारी निभावली आहे. अनिकेत जंगम यांनी गीतलेखन केलं आहे, तर सचिन अंबट यांनी म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे. अनुजा आणि हरीश या जोडीच्या म्युझिक व्हिडिओतील सफाईदार वावरानं या गाण्याला चार चाँद लावले आहेत. प्रेमाची हळुवार भावना या गाण्यातून अप्रतिम पद्धतीनं सादर करण्यात आली आहे.

‘हळूवार पाऊले’ हे प्रेमगीत आहे. कोकणातल्या नितांत सुंदर परिसरात या म्युझिक व्हिडिओचं नेत्र सुखद चित्रीकरण करण्यात आलं आहे. तर हलक्याफुलक्या शब्दांना तितकंच श्रवणीय संगीत ही या म्युझिक व्हिडिओची खासियत आहे. ‘हळुवार पाऊले वेचित साजरी किनारी आली, रुणझुणता पैंजण नाद बासरीत गुंफून गेली’ अशा हळुवार ओळी असलेला नवाकोरा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिक या युट्यूब चॅनेलवर लाँच करण्यात आला आहे.

हेही वाचा - Amata Subhash Birthday : चतुरस्त्र अभिनेत्री अमृता सुभाषचे सुंदर फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.