ETV Bharat / entertainment

Bigg Boss 17 day 25 : ऐश्वर्या - अंकिताचं भांडण सुरूच, मन्नारा चोप्रानं घेतलं अभिषेक कुमारचं चुंबन - मन्नारानं दिलं अभिषेक कुमारच्या गालावर चुंबन

बिग बॉसच्या 17 व्या सिझनच्या 25 व्या एपिसोडची सुरुवात ऐश्वर्या शर्मा आणि अंकिता लोखंडे यांच्यातील कडाक्याच्या भांडणानं झाली. दिवसेंदिवस शोमधील नाट्य रंगत चाललंय. मन्नारा चोप्रानं अभिषेक कुमारच्या गालावर चुंबन देऊन एपिसोडमध्ये ऊर्जा भरायचं काम केलं.

Bigg Boss 17 day 25
ऐश्वर्या - अंकिताचं भांडण सुरूच
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 10:52 AM IST

Updated : Nov 9, 2023, 12:05 PM IST

मुंबई - बिग बॉसच्या 17 व्या सिझनमध्ये भरपूर रंजक नाट्य पाहायला मिळतंय. प्रत्येक एपिसोड काही तरी नवं नाट्य घेऊन येतो. 25 व्या एपिसोडची सुरुवात ऐश्वर्या शर्मा आणि अंकिता लोखंडे यांच्यातील कडाक्याच्या भांडणानं झाली. दुसऱ्या बाजूला मन्नारा चोप्रा अभिषेक कुमारचा मूड सुधारण्यासाठी फ्लर्ट करताना दिसली. अखेरीस तिनं त्याच्या गालावर गोड चुंबन दिलं.

मन्नारा चोप्रानं बिग बॉसकडे मागितली घर सोडण्याची परवानगी

एका नाट्यमय घडामोडीनंतर मन्नारा चोप्रानं बिग बॉसकडे कन्फेशन रूममध्ये जाण्याची परवानगी मागितली. आपल्याला आईची आठवण येत असल्यामुळे घरातून बाहेर जाण्याची इच्छा तिनं बोलून दाखवली. अंकितानं तिचं सांत्वन केलं. घरातील बेभरोशाच्या मुलींमुळे, त्यांच्या कटकारस्थानमुळे तिला शो सोडण्याची इच्छा असल्याचंही तिनं सांगितलं.

ऐश्वर्या शर्मा बनली अंकिता लोखंडेच्या रागाची शिकार

अभिषेक कुमार आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यात स्वयंपाकघरातील जबाबदारीबाबत जोरदार वादविवाद झाला. हे मतभेद नंतर वाढतच गेले आणि विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांना यात भाग घ्यावा लागला. अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा शोमध्ये येण्यापूर्वी एकमेकांना ओळखत असूनही, त्यांचं शोमध्ये जमत नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यांच्यातील नात्यात कटुता वाढत गेली आहे. यामुळे त्यांच्या पतींनाही त्याच्या बाजूनं भाग घेऊन हस्तक्षेप करावा लागलाय. दोघींनीही एकमेकींची उणीदुणी काढली आणि ऐश्वर्याने अंकिताची थट्टा करण्यापर्यंत मजल मारली आणि दावा केला की तिची ती बाहेरच्या जगात जशी दिसते तशी ती नाही.

रेशनचा टास्क

बुधवारच्या एपिसोडच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे एक आव्हानात्मक कार्य होतं, ज्यात स्पर्धकांना जोरदार शाब्दिक चकमकीत सहभागी होऊन अन्न जिंकण्याची संधी होती. दम, दिल आणि मकानमधील स्पर्धकांमध्ये आमनेसामने झाली. रेशन टास्कमध्ये तीन फेऱ्या होत्या. पहिल्या फेरीत अंकिता आणि सनी, त्यानंतर ऐश्वर्या विरुद्ध अरुण आणि शेवटी ईशा विरुद्ध अनुराग यांच्यात सामना झाला.

पहिल्या फेरीत अंकिताने तिचे व्यक्तिमत्त्व सर्वांसमोर मांडले, तर अरुणने तिची खिल्ली उडवली आणि हा निर्णय हाऊस नंबर २ च्या सदस्यांनी काढला. प्रत्येक फेरीतील विजेत्याला स्टोअर रूममधून रेशन गोळा करण्याचा विशेषाधिकार दिला जाणार होता. दोन्ही स्पर्धकांमध्ये वाद रंगला, यामध्ये सनीने असे ठामपणे सांगितले की अंकिता लोखंडेला घरात कोणीही घाबरत नाही आणि ती केवळ विकीच्या प्रभावाखाली खेळत आहे. हाऊस नंबर १ मधील सदस्यांनी सनीविरोधात आघाडी केली आहे. शेवटी, हाऊस नंबर 2 ने अंकिताच्या बाजूने निर्णय घेतला, तिला रेशन मिळवण्यासाठी स्टोअर रूममध्ये धावायला सांगितलं.

दुसऱ्या फेरीमध्ये अरुण ट्रोल झ्लायनं ऐश्वर्यासोबत स्पर्धा करतो. हाऊस नंबर 2 मधील सदस्य अरुणला पाठिंबा देतात आणि अखेरीस त्याच्या बाजूने निर्णय देतात.

तिसर्‍या फेरीत खेळताना ईशा आणि अनुराग सहभाग घेतात. अनुराग दाखवून देतो की ईशा समर्थ आणि अभिषेकवर खूप अवलंबून असते आणि तिला अंकिता 2.0 म्हणते. हाऊस नंबर 2 मधील सदस्यांनी अनुरागला विजेता म्हणून निवडलं. असं असलं तरी अनुराग आणि समर्थ यांच्यात मतभेद निर्माण होतात.

मन्नारा चोप्रानं घेतलं अभिषेक कुमारचं चुंबन

दुसऱ्या दिवसाची सुरुवात बिग बॉसच्या गाण्यानं झाली. या गाण्यावरच घरातील सर्व सदस्य झोपेतून जागे झाले. सकाळी अभिषेक, ईशा आणि ऐश्वर्या यांच्यात दुधाच्या वापरावरून भांडण झालं आणि नंतर खानजादी आणि अभिषेक फ्लर्ट करताना दिसले. त्यानंतर, अभिषेकने ईशाला त्याच्यासाठी कॉफी तयार करण्याची विनंती केली, परंतु तिला सर्दी झाल्याचे कारण देत तिने नकार दिला. ईशाने अभिषेकला कॉफी देण्यास नकार दिल्यानंतर तो एका कोपऱ्यात रडताना दिसला. मुनावर खानजादीला अभिषेकबद्दल मनापासून काही वाटत नसल्यास त्याच्यापासून अंतर ठेवण्याचा सल्ला देतो. खानजादी म्हणते की, अभिषेकला दोघांबद्दलही इमोशन्स आहेत तो तिच्यासाठी पात्र नाही. इशा आणि खानजादी यांच्यामुळे नाराज झालेला अभिषेक मन्नारा चोप्राच्या गालाचं चुंबन घेतो.

हेही वाचा -

1. Kareena Kapoor : 'अवनी बाजीराव सिंघम'च्या भूमिकेत करीना कपूर खान, 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक रिलीज

2. Prabhas : प्रभास गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून इटलीहून मायदेशी परतला

3. Ranbir Kapoor Animal : 'अ‍ॅनिमल'ला अमेरिकेत मिळाल्या 'इतक्या' स्क्रीन्स, 'जवान'लाही टाकले मागे

Last Updated : Nov 9, 2023, 12:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.