ETV Bharat / entertainment

Bigg Boss 17 day 1 highlights: विकी जैनवर टीका झाल्यानं अंकिता लोखंडे बिथरली, मन्नारा चोप्राला सापडला नवा दोस्त - ईशा मालवीय

Bigg Boss 17 day 1 highlights: बिग बॉस या लोकप्रिय रिएालिटी शोच्या 17 व्या सिझनचा पहिला एपिसोड सोमवारी प्रसारित झाला. विकी जैननं स्पर्धकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जी लोकांना फारशी आवडली नाही. तर मन्नारा चोप्रा आणि मुनावर फारुकी यांच्यात मैत्री निर्माण होत असल्याचं दिसत असून ही नवी जोडी सध्या प्रेक्षकांना आवडतेय.

Bigg Boss 17 day 1 highlights:
बिग बॉस शोच्या 17 व्या सिझनचा प्रीमियर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 12:36 PM IST

मुंबई - Bigg Boss 17 day 1 highlights: बिग बॉस या रिएलिटी शोच्या 17 व्या सिझनचा प्रीमियर रविवार 15 ऑक्टोबर 2023 रोजी झाला. सलमान खाननं हा ग्रँड प्रीमियर होस्ट केला. बिग बॉसच्या या सीझनमध्ये मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे, विकी जैन, मन्नारा चोप्रा, ऐश्वर्या शर्मा, नील भट, ईशा मालवीय, नवीद सोले, अनुराग डोभाल, सना रईस खान, जिग्ना वोरा, सोनिया बन्सल, खानजादी, सनी आर्या, रिंकू धवन, अरुण मॅशेटे आणि अभिषेक कुमार यांच्यासह १७ स्पर्धकांची मनोरंजक यादी आहे.

बिग बॉस 17 हा शो दिल, दिमाग आणि दम या विषयावर केंद्रित आहे, आणि याच थीमवर आधारित बीग बॉस हाऊस तीन विभागांमध्ये विभागलं गेलंय. अंकिता लोखंडे आणि विकी जैन आणि ऐश्वर्या शर्मा आणि नील भट हे सेलिब्रिटी कपल म्हणून घरात दाखल झालेत.

बिग बॉस 17 च्या पहिल्याच दिवशी कथित माजी जोडपे अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांनी स्टेजवर आणि घरात दोघांमध्ये वाद घालून गोंधळ उडवून दिला. इतर स्पर्धक त्यांच्या या बदललेत्या वागण्यामुळे हैराण झाल्याचं दिसले. दरम्यान, अभिषेकनं खुलासा केला की, तहलका भाई या आणखी एका उमेदवाराने युती करण्यासाठी शोपूर्वी त्याच्याशी संपर्क साधला होता. हा खुलासा ऐकून ईशा मालवीय थक्क झाली.

बिग बॉस च्या 17 व्या सिझनमध्ये मुनावर फारुकीमध्ये मन्नारा चोप्राला एक चांगला मित्र दिसतोय. दोघंही एकमेकांची खिल्ली उडवताना दिसले. असं दिसतंय की, दोघांमध्ये एक छान मैत्री निर्माण होतेय. मन्नारा आणि फारुकी यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत.

बिग बॉसनं या सीझनमध्ये स्वतः पक्षपाती स्वभावचा असल्याचं सांगितलंय. त्यानं सांगितलंय की जे स्पर्धक शोमध्ये चांगले प्रदर्शन करतील त्यांच्याबद्दल तो पक्षपाती असेल आणि जे शोमध्ये योगदान देणार नाहीत त्यांची काळजी घेणार नाही. दरम्यान, बिग बॉसने विकी जैनला फटकारल्यामुळे अंकिता लोखंडे निघून गेली. बिग बॉसनं विक्की जैनला मनाच्या खेळात अडकल्याबद्दल शिक्षा केली होती. त्यंने विकीला युक्तीनं खेळायचं असेल तर 'दिमाग का घर'मध्ये जाण्याचा सल्ला दिला. बिग बॉसने पुढे सांगितले की, केवळ पत्नीमुळे त्यानं आपल्या पत्नीला 'दिल का घर'मध्ये फॉलो करायला नको होते. या प्रकारामुळं अंकिता लोखंडे बिथरल्याचं दिसून आलं.

बिग बॉसचे सकाळचे नवीन गाणे ऐकल्यानंतर घरातील सदस्य झोपेतून जागे होताना उत्साही दिसले. या गाण्यावर घरातील सर्व सदस्य बिनधास्त नाचले. बिग बॉसनं घरातील सदस्यांना रोज सकाळी रांग तयार करून नवीन गाणं गाण्यास सांगितलंय.

हेही वाचा -

1. Parineeti Chopra Pictures : परिणीती चोप्रा लग्नानंतर गर्ल्सट्रिपवर ; फोटो झाले व्हायरल...

2. Hema Malini 75th Birthday : हेमा मालिनींच्या 75 व्या वाढदिवसाला सेलेब्रिटी स्टार्सची मांदियाळी

3. Alia Bhatt Jets Off To Delhi : आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत दिल्लीला रवाना, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं होणार सन्मान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.